Aurangabad : सत्तारांच्या चेंडूवर इम्तियाज यांची दांडी गुल..

त्यानंतर स्वतः सत्तार यांना आश्चर्य वाटले. पण सत्तार भाई हे मला कधीच आऊट करणार नाहीत, ते नेहमीच मला जिंकवतील असे म्हणत इम्तियाज यांनी ही विकेट हसण्यावारी नेली. (Mp Imtiaz Jalil)
Mp Cricket Tournament News, Aurangabad
Mp Cricket Tournament News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावतीने शहरात खासदार चषक क्रिकेट स्पर्धेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना बाॅल (फेकी) टाकला आणि त्यावर इम्तियाज यांची दांडी गुल झाली.

Mp Cricket Tournament News, Aurangabad
MNS : राज ठाकरेंनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी ; दिला 'हा' आदेश

त्यानंतर स्वतः सत्तार यांना आश्चर्य वाटले. पण सत्तार (Abdul Sattar) भाई हे मला कधीच आऊट करणार नाहीत, ते नेहमीच मला जिंकवतील असे म्हणत इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी ही विकेट हसण्यावारी नेली. शहरातील वाढत्या नशेखोरीच्या विरोधात प्रचार म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिले जाते.

उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी अस्तीककुमार पांडेय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थीत होते. इम्तियाज यांनी उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्वपक्षीय मंत्री, लोकप्रतिनीधी आमदारांना दिले होते. मात्र सत्तार वगळता कोणीच या स्पर्धेच्या उद्घाटनाला फिरकले नाही.

शहरातील आमखास मैदानावर भरवण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धे व्यतिरिक्त कुस्ती, फुड फेस्टीव्हलचे आयोजन पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. कवी संमेलन, मुशायऱ्याचे देखील आयोजन खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आमखास मैदानावर भव्य असे फुटबाॅल स्टेडिअम उभारण्याची शहरवासियांची इच्छा असल्याचे सांगत त्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार व प्रशासनातील अधिकारी निश्चित प्रयत्न करतील अशी अपेक्षा देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com