संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला

संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला

Hingoli news| Santosh Bangar| शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याने बांगर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हिंगोली : हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मुंबईत थेट मातोश्रीला आव्हान देत शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ संतोष बांगर या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मोठ शक्तिप्रदर्शन करत मातोश्रीचे आदेश धुडकावून लावले. त्यानतंर आता पुन्हा हिंगोलीत शिवसेना (Shivsena)-शिंदे गटातील वादात पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील आगांमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढविण्यासाठी शिंदे गटाने आयोजित केली होती. आज सकाळी 11 वाजता हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित केली आहे. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांची कोणत्याही प्रकारची बैठक आयोजित केली नसल्याचे सांगत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे या शिंदे व ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोण कोणते शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला
कोकणातही शिवसेनेला खिंडार पडणार ? वीस नगरसेवक उदय सामंतांच्या संपर्कात

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी विधिमंडळात शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला मतदान केलं होतं मात्र, बहुमत चाचणी सिद्ध करत असताना त्यांनी अचानकपणे शिंदे गटाला मतदान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना घेऊन मुंबई गाठत मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देत त्यांचा सत्कार केला आणि थेट 'मातोश्री'ला(Matoshri) डोळे दाखवण्याचे धाडस केलं.

बांगर यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याने बांगर चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिले आहे. माझी या पदावर बाळासाहेब ठाकरे यांनी नेमणुक केल्याने या पदावरून मला कोणीही काढू शकत नाही, असे त्यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितले आणि शिंदे यांचीच खरी शिवसेना म्हणत शिंदेनी आपल्याला जिल्हाप्रमुख म्हणून कायम ठेवल्याचे सांगत खुलेआम ठाकरेंनाच आव्हान दिले. ते इथेच न थांबता त्यांनी थेट मुंबईत जाऊन आपली ताकद दाखवत ठाकरेंना डिवचलं आहे. यामुळे त्यांची राज्यभर चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com