Santosh Bangar News : संतोष बांगर यांचं पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ''सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्यांना...''

Maharashtra Politics : ''...ते लोकही आमच्यासोबत येतील !''
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama

Nanded : शिवसेने(शिंदे गट)चे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बेधडक, वादग्रस्त विधानं आणि आक्रमक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. आक्रमक भूमिकेमुळे बांगर यांच्या अडचणीतही आल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा एकदा आमदार बांगर यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचं समोर आलं आहे. आणि विशेष म्हणजे हे वक्तव्य आमदार बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केलं आहे.

नांदेड येथे शनिवारी (दि.27) रोजी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.एका कार्यक्रमात आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कोणी जर आपल्याला बोलत असेल, तर त्याला तिथल्या तिथं ठेचण्याचं काम आपल्याला करावं लागेल असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केलं होतं.

MLA Santosh Bangar
New Parliament Building : 'किंगखान' अन् अक्षय कुमारचा Video मोदींनी केला Retweet ; म्हणाले, 'सुंदर अभिव्यक्ती...'

आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर गंभीर आऱोप केले आहेत. जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्याची चैन द्यावी लागेल असं खळबळजनक विधान केलं आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं बक्षीस देखील मी दिले. पण थोरात खासदारकीला फक्त पैसे गोळा करण्याचं काम केलं असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे. त्यामुळे थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका. तसेच जे लोक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, तेही आमच्यासोबत येतील असं देखील संतोष बांगर म्हणाले.

शिंदेंचा विरोधकांना टोला...

खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde)यांनी या कार्यक्रमात विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे ते सध्या आव्हान, टीका करीत आहेत. त्यांना टीका करू द्या; परंतु आम्हाला प्रत्येक क्षण हा विकासासाठी घालवायचा आहे. आम्हाला देशाचा विकास करायचा आहे असंही शिंदे म्हणाले.

MLA Santosh Bangar
Savarkar Jayanti : घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांकडून मंगलमय सोहळ्यात मिठाचा खडा; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

श्रीकांत शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणं...

खासदार श्रीकांत शिंदे हे शनिवारी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव येथील कयाधू नदीवरील पुलाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका आजीबाईने त्यांना गाठले. नातू कामाला पुण्याला गेला, आता कोणी नाई तुमच्या बिगर, साहेब मला घर बांधून द्या असे गाऱ्हाणे आजीने शिंदे यांच्यासमोर मांडले. शिंदे यांनीही तातडीने आजीबाईला घरकूल बांधून देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर शिंदे यांच्या कृतीमुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यावर शिंदे यांनी लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया दिली.

'मविआ'त तुम्हांला किती जागा मिळणार?

शिवसेनेचे नेते व आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. गायकवाड म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला सल्ला त्यांनी ऐकायला पाहिजे. तसेच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीपासून दूर व्हावे, त्यांना बळी पडू नये. याचवेळी आमच्या तर जागा वाढणारच आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला किती जागा देते, याचं आत्मपरीक्षण तुम्ही करावं असा टोलाही लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com