Sanjay Shirsat Reaction News : आम्ही मुर्ख आहोत का ? बानवकुळेंना जागा वाटपाचे अधिकार कुणी दिले ?

Shivsena : आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच त्यांनी बोललं पाहिजे.
Mla Sanjay Shirsat-Chandrashekar Bawankule News
Mla Sanjay Shirsat-Chandrashekar Bawankule NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. ते म्हणतात, शिंदे गटाला ४८ जागा देवू, आम्ही मुर्ख आहोत का? मुळात बावनकुळे यांना जागा वाटपाचे अधिकार कुणी दिलेत? अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांच्या विधानाची खिल्ली उडवली.

Mla Sanjay Shirsat-Chandrashekar Bawankule News
Jalna Loksabha Constituency : तीन पक्ष एकत्र लढले तरी दानवेंना `चकवा` देणे अशक्य..

विधानसभा निवडणुकीत भाजप २४० पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याने तयारीला लागा, शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील कारण त्यांच्याकडे तितकेच आमदार आहेत, असे विधान बावनकुळे यांनी काल मुंबईतील सोशल मिडिया कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. (Sanjay Shirsat) यावरून ठाकरे गटाने शिंदेच्या शिवसेनेला डिवचले, हीच का तुमची किंमत? (Shivsena) असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला होता.

आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील बावनकुळेच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, बावनकुळे यांच्या वक्तव्यात काहीही दम नाही. मुळात त्यांना एवढे अधिकार कोणी दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. राज्यात शिवसेना-भाजपची युती आणि सरकार आहे. बावनकुळे हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या अशा विधानामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होवू शकतो याची जाणीव त्यांना असयाला हवी.

फक्त ४८ जागा लढवायला आम्ही त्यांना मूर्ख वाटतो का? जागा वाटप हा वरिष्ठ पातलीवरचा विषय होईल, दोन्ही पक्षाचे नेते यावर निर्णय घेतील. अशा विधानांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अतिउत्साहाच्या भरात बावनकुळे यांनी असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच त्यांनी बोललं पाहिजे, असा टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in