Sanjay Shirsat On Loksabha : लोकसभा, विधानसभा एकत्र झाल्या, तर आम्ही तयार..

Maharashtra : राऊत यांची भूमिका पाहता लवकरच ठाकरे गट हा राष्ट्रवादीच्या दारात उभा असलेला दिसेल.
Mla Sanjay Shirsat News
Mla Sanjay Shirsat NewsSarkarnama

Shivsena : निवडणुकीसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ पाहता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तर चांगलेच आहे. (Sanjay Shirsat On Loksabha) पण सध्याची परिस्थीती पाहता या निवडणुका एकाचवेळी होतील असे वाटत नाही. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनूसार `वन नेशन वन इलेक्शन`, प्रमाणे लोकसभा, विधानसभा एकत्र झाल्या तर इतर पक्षांप्रमाणे आम्ही देखील तयार आहोत, असे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Mla Sanjay Shirsat News
Atul Save Replay Mla Ajbe : टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर आमदारकीचा राजीनामा द्या..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांना उद्देशून जनता यांना जमलागोटा देईल, या विधानावरून केली जात असलेली टीका निर्रथक आहे. मुख्यमंत्र्यांची ती भाषा आहे, मग त्यांनी कोणता शब्द वापरायला पाहिजे होता? असा सवाल करत त्यांनी ग्रामीण संस्कृती जपल्याचे शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले.

संजय शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीतील इतर पक्षांवर कुरघोडी करू पाहत आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरून हे दिसून आले आहे. (Shivsena) त्यात संजय राऊत यांनी ट्विट करत तेल ओतण्याचे काम केले आहे. राऊत यांची भूमिका पाहता लवकरच ठाकरे गट हा राष्ट्रवादीच्या दारात उभा असलेला दिसेल, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.

दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते, यावरून देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर देखील मुख्यमंत्री एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेले असतील तर त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री बैठकीला हजर राहतात. त्याच प्रमाणे दिल्लीत फडणवीसांनी बैठकीला हजेरी लावली, तर त्यात एवढा गोंधळ करण्याची अजिबात गरज नसल्याचेही शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com