Mla Sanjay Shirsat News
Mla Sanjay Shirsat NewsSarkarnama

Sanjay Shirsat On Court decision : विरोधक हवेत बोलत आहेत, निकाल आमच्या बाजूनेच लागणार...

Maharashtra : महाविकास आघाडी कायम राहणार नाही. वज्रमुठ वगैरे सगळे झूट आहे.

Shivsena : राज्यातील सत्तांतरानंतर त्या १६ आमदारांचे काय होणार? यावर बरीच चर्चा सुरू आहे. (Sanjay Shirsat On Court decision) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकार जाणार असा दावा केला जातोय, तर सत्ताधारी मात्र आमचे सरकार मजबुत आहे, निकाल आमच्याच बाजूने लागणार असे सांगत आहेत.

Mla Sanjay Shirsat News
MLA Meghna Bordikar : 'भारत गौरव पुरस्कारा'च्या मानकरी आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत बोलतांना विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विरोधक हे हवेत बोलत आहेत, निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावा केला आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील नेते वकिलांशी चर्चा करून प्रतिक्रिया देत आहेत, तो त्यांचा अंदाज असू शकतो. पण हे हवेतले बोलणे आहे, प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा आमच्या बाजूने तो असले, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

राज्यातील महाविकास आघाडीचेच भवितव्य धोक्यात आहे. (Shivsena) अजित पवार नाराज आहेत, काॅंग्रेसने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे, तर ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. त्यामुळे मी एकदा नाही, तर शंभरवेळा सांगितले आहे की, महाविकास आघाडी कायम राहणार नाही. वज्रमुठ वगैरे सगळे झूट आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तो आमच्या विरोधातच जाणार असे चित्र विरोधकांकडून निर्माण केले जात आहे. परंतु जेव्हा निकाल येईल तेव्हा सगळ्यांनाच लक्षात येईल. आम्ही देखील या निकालाची उत्सकूतेने वाट पाहत आहोत. आमच्या सरकारला धोका नाही, निकाल आमच्या बाजूनेच लागेल, याचा पुनरुच्चार देखील शिरसाट यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com