Sanjay Shirsat News : ठाकरे गटाची बाजू लंगडी, म्हणूनच सिब्बल यांचे भावनिक आवाहन..

Shivsena : तर निश्चित आम्ही पक्षांतर बंदी कायद्यानूसार कारवाईस पात्र ठरलो असतो.
Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Aurangabad : आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा कुठल्याही प्रकारच्या व्हिपचे उल्लंघन केले नाही. एखाद्या पक्षाच्या बैठकीला गेलो नाही, म्हणून व्हिपचे उल्लंघन झाले असे म्हणणे चुकीचे आहे. (Shivsena) व्हिप हा विधानसभेच्या सभागृहात लागू होतो. एखाद्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तो लागू असतो. अशावेळी जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर मग आम्ही व्हिप नाकाराला असे म्हणता येईल.

Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Ambadas Danve News : शिंदेजी बाळासाहेबांच्या विचारांवरील आपली निष्ठा बेगडीच..

शिवाय कुठलाही व्हिप किंवा त्यांची नोटीस ही आठवडाभर आधी द्यावी लागते. आम्हाला ४८ तासांत देण्यात आली होती. (Supreme Court) त्यामुळे पक्षाच्या विरोधात जावून आम्ही काही केले नाही? व्हिपचे उल्लंघन देखील आमच्याकडून झालेले नाही, त्यामुळे आमच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानूसार कारवाई केली जावू शकत नाही, असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला.

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू लंगडी आहे, म्हणूनच त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी भावनिक आवाहन केल्याची टीकाही त्यांनी केली. शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानूसार कारवाई करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करतांना भावनिक आवाहन देखील केले.

यावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. आमदार संजय शिरसाट यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलतांना भाष्य केले. शिरसाट म्हणाले, पक्षाच्या बैठकीला आम्ही गैरहजर राहिलो म्हणून आमच्यावर कारवाई होवू शकत नाही. पक्षाचा व्हिप हा सभागृहात लागू होत असतो. पक्षाच्या बैठकीला गेलो नाही म्हणून व्हिपचे उल्लंघन झाले असे होत नाही.

आम्ही केलेल्या उठावानंतर सभागृहात महाविकास आघाडी सरकारने सभागृहात बहुमत चाचणी घेतली असती आणि तेव्हा आम्ही व्हिपच्या विरोधात कृती केली असती तर निश्चित आम्ही पक्षांतर बंदी कायद्यानूसार कारवाईस पात्र ठरलो असतो. पण अशा प्रकारची बहुमत चाचणीच विधानसभेत झाली नाही.

Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Eknath Shinde News : मुख्यमंत्री म्हणाले मी थकतच नाही, रात्री बारा वाजता हाॅटेलचे उद्घाटन..

सर्वोच्च न्यायालयात देखील याच मुद्यावर जोर देण्यात आला. आमच्या वकिलांनी हीच बाजू मांडली. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या ही बाब लक्षात आली. ठाकरे गटाची बाजू लंगडी आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी भावनिक आवाहन केले. पण न्यायालय तथ्य, पुरावे तपासून न्याय देत असतो आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला तो मिळेल, अशी अपेक्षा देखील शिरसाट यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com