Sanjay Shirsat News : निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणता, उद्या कोर्टात निकाल विरोधात गेला तर..

Aurangabad : जी काही कायदेशीर लढाई आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणी थांबवलेलं नाही.
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Shivsena : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दिले आहे. हा निकाल मान्य करण्याऐवजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाने शेण खाल्ले असे म्हणत आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात विरोधात निकाल गेला तर असं म्हणू नका, असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला.

Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Harshvardhan Jadhav : लोकसभेला शिवसेनेच्या विरोधात लढलेल्या जाधवांना आता उपरती...

मातोश्रीच्या बाहेर काल उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण आणि वापरलेली भाषा यातून त्यांचे फस्ट्रेशन दिसून आले, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहे. (Shivsena) शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये ठिकठिकाणी राडा होत असतांनाच नेते देखील एकमेकांवर तुटून पडले आहेत.

ठाकरे यांनी मातोश्री बाहेर केलेले भाषण आणि त्यात एकनाथ शिंदेंना चोर म्हणत धनुष्यबाण चोरल्याची त्यांनी केलेली टीका शिंदे समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. यावर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी पातळी सोडून टीका करू नये, निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा त्या निकालाकडे लक्ष द्यावे.

पण जसं विरोधात निकाल गेल्यावर त्यांनी निवडणूक आयागाने शेण खाल्ले अशी भाषा केली, तशी उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर ते करणार आहेत का? जी काही कायदेशीर लढाई आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणी थांबवलेलं नाही. गाडणार कोणाला आणि राहणार कोण, याचा निर्णय जनता घेईल.

त्यासाठी तुम्हाला किंवा मला सांगायची गरज नाही. जनता आपले मत बनवत असते. जर जनतेने आपल्या विरोधात मत बनवले असेल, तर त्याला आपण दोष देता कामा नये. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यामुळे एखाद्याला कावीळ झाल्यावर जसं सगळं जग पिवळ दिसायला लागतं, तसं दिसत असल्याची टीकाही शिरसाट यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com