राज ठाकरेंच्या औरंगाबाद, अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांचा वर्मी घाव
Sanjay raut

राज ठाकरेंच्या औरंगाबाद, अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांचा वर्मी घाव

Sanjay raut| raj thackeray| Kirit Somaiya| किरीट सोमय्यांवरही साधला निशाणा

मुंबई: 'राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याने ना सरकारला आव्हान आहे ना शिवसेनेला. या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची असेल तर घेऊ देत. कोणीतरी इतर कोणत्या पक्षाच्या स्पॉन्सरशिपवर राजकारण करत असेल तर तेही करूदे. शिवसेने आतापर्यंत स्वत:च्या जीवावर महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण केलं आहे आणि यापुढेही करत राहीन,' अशा खोचक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टिका केली आहे.

विशेष म्हणजे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी सभा घेत असायचे त्याच ठिकाणी राज ठाकरेही सभा घेणार असल्याची चर्चा आहे. कोणाला बाळासाहेबांची कॉपी करायची असेल तर तुम्ही काय करणार?' असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांनी आपण ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले, यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला. अयोध्या सगळ्यांची आहे. अयोध्या सगळ्यांची आहे. रामलल्ला सगळ्यांचे आहेत. जर कुणाला रामलल्लांची आठवण झाली तर त्यांनी नक्की अयोध्येला जावे, पण जर कोणी राजकारणासाठी तिथे जात असेल तर रामलल्ला त्यांना आशीर्वाद देत नाही.' असं ते म्हणाले.

Sanjay raut
राज ठाकरेंच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर वळसे पाटलांनी भोंग्यांबाबत घेतला मोठा निर्णय

याच वेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या विक्रांत घोटाळा चौकशी प्रकरणावरही भाष्य केलं. जे स्वतः उघडे नागडे झालेले आहेत त्यांच्याकडून पोल-खोलची काय अपेक्षा करत आहात. विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी गेले असतील आता हा पोलीस तपासाचा भाग आहे. इडी किंवा इन्कमटॅक्स पेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम आहेत.

राज भावनांमध्येमध्ये जाणाऱ्या पैशांना कुठे पाय फुटले ते कोणाच्या खात्यात गेले, या संदर्भात पोलिस अधिक तपास करतील याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही, भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्याने महाराष्ट्र झालेला नाही राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल, असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.