
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिेषदेला जाणार असल्याचं दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे संजय राऊत मुख्यमंत्र्यांना काय प्रश्न विचारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. पण आता इच्छा झाली तरच आपण तिथे जाऊ, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच न जाण्याचं त्यांनी कारणही सांगितलं आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाण्याबाबत विचारले असता, राऊत म्हणाले, मला संधी दिली तर मी त्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारेल. मी पत्रकार आहे. पण जर पत्रकार परिषदेलाही इतका पोलिस बंदोबस्त लावला, पासेस द्यावे लागले, मी दोन प्रश्न विचारण्यासंबधी प्रश्न काय निर्माण केला. तर मला रात्री पोलिस भेटायला आले. अधिकाऱ्यांचे फोन आले. मला इच्छा झाली तर मी जाईल, पण मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला हाच गोंधळ नकोय.
मराठवाड्यात भयंकर दुष्काळ असताना, जिथे प्यायला पाणी नाही, असे असतानाही तीन तासांच्या बैठकीसाठी राज्य सरकारने संपूर्ण प्रशासन कामाला लावलं आहे. पंचातारांकित हॉटेलमध्ये बसून हजारो रुपये जेवणावर खर्च करून तुम्ही मराठवाड्याचा दुष्काळवर चिंतन करणार आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संभाजीनगर मध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यात भयंकर दुष्काळ असताना ज्या प्रमाणे मंत्रिमंडळाच्या अय्याशीवर आणि थाटमाटावर कोट्यवधींचा खर्च सुरू आहे. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. याचा अर्थ असा नाही की संभाजीनगरच्या पुलाखाली, एखाद्या लॉजवर बैठक घ्या, पण तिजोरीत खडखडाट असताना, शेतकऱ्यांना मदत मिळत नसताना, तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन, लाखो रुपये खाण्यापिण्यावर उडवत आहात. आधीच्या सरकारने मंत्र्यांसाठी 'सुभेदारी' हे शासकीय विश्रामगृह बांधून ठेवले असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून मराठवाड्याच्या दुष्काळावर काय चिंतन करणार, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राऊत म्हणालेस मी ऐकलं की, काहींना स्युट्स मिळाले नाहीत म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही झाप झाप झाले आहे. पण तुम्ही इथे मराठवाड्याच्या दुष्काळावर चिंतन करायला आलात की आराम करायला आलात. याच वेळी संजय राऊतांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमावरही निशाणा साधला आहे. क्रांतीकारक राहिले बाजूला आणि ठग मंडळाच्या क्रांतीकारकांचेच फोटो लावले आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला आपापल्या पक्षांना ठगवले ते जणू काही मराठवाडा क्रांतीसंग्रामाचे क्रांतीकारण असल्यासारखे संपूर्ण शहरात त्यांचे होर्डिंग्स लावले आहेत टोलाही संजय राऊतांनी लगावला.
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये तीन जवान शहीद झाले. पण आपले पंतप्रधान दिल्लीतील भाजपा मुख्यालयात स्वत:वर फुले उधळून घेत आहेत. पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली का, आपल्यामुख्यमंत्र्यांनीही श्रद्धांजली वाहिली का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, आज क्रांती चौकात शिवसेनेचा अभिवादन कार्यक्रम आहे. अंबादास दानवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांना आम्ही विसरणार नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.