Sandipan Bhumre On Court Decision News : आमची बाजू कायदेशीर, अध्यक्षांचा निकालही आमच्या बाजूनेच लागेल..

Shivsena : आमचे सरकार जावे म्हणून पुजाअर्चा केल्या, ते आता तोंडघशी पडले आहेत.
Sandipan Bhumre On Court Decision News
Sandipan Bhumre On Court Decision NewsSarkarnama

Shivsena : राज्यातील शिंदे सरकार हे अबाधित राहणार आहे, त्याला कुठलाही धोका नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. आमची बाजू कायदेशीर आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आणि प्रतिक्रिया राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली.

Sandipan Bhumre On Court Decision News
Supreme Court Live : सगळे निर्णय आमच्या बाजूने लागले; ठाकरे गटाचे वकील सिंघवींचा मोठा दावा...

संदीपान भुमरे म्हणाले, राज्यात सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर सर्वत्र जल्लोष सुरू आहे. आमची कायदेशीर बाजू भक्कम असल्यामुळेच निकाल आमच्या बाजूने लागला आहे. (Shivsena) १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आमच्यावर टांगती तलवार कायम आहे, असे आता बोलले जात आहे, परंतु आता कुठलीही टांगती तलवार आमच्यावर नाही.

विधासभा अध्यक्ष हे देखीलच कायदेशीरपणे निर्णय देतील आणि तो देखील आमच्या बाजूनेच असेल. (Maharashtra) त्यामुळे आमचे मंत्रीपद, आमदारकी आणि शिंदे सरकारला कुठलाही धोका राहिलेला नाही. ज्यांनी आमचे सरकार जावे म्हणून पुजाअर्चा केल्या, ते आता तोंडघशी पडले आहेत, असा टोला देखील भुमरे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला.

हा निकाल आम्हाला अपेक्षित होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तणाव माझ्या व आमच्या कुठल्याच सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर नव्हता, असेही भुमरे म्हणाले. निवडणूक आयोगाने यापुर्वीच आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिले आहे. ते देखील कायद्यानूसारच होते, आता सर्वोच न्यायालयाने देखील आमच्या सरकारला दिलासा दिला आहे. त्यामुळे आम्ही पुढचा कार्यकाळ पुर्ण करू, आणि यापुढील सरकार देखील शिंदे यांच्या नेतृत्वाखालीलच असेल असा दावा देखील भुमरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com