Sandipan Bhumre News : विमानातील हायफाय जेवण नाकारत भुमरेंची चटणी-भाकरीलाच पसंती..

Shivsena : सीटवर मांडी घालून बसत त्यांनी चटणी भाकरी खाल्ली आणि तृप्तीचा ढेकर दिला.
Minister Sandipan Bhumre News
Minister Sandipan Bhumre NewsSarkarnama

Chhatrapati Smabhajinagar : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) तसे साधे व्यक्तीमत्व. राजकारणात भाजपचे रावसाहेब दानवे जसे आपल्या ग्रामीण शैली आणि साधेपणासाठी ओळखले जातात, तसेच काहीसे भुमरेंच्या बाबतीत देखील आहे. पाचवेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर उंची वस्त्र, महागड्या गाड्यांमधून भुमरे फिरतात.

Minister Sandipan Bhumre News
Kishori Pednekar News : शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत भाजपला चुकवावी लागेल..

पण मतदारसंघात असो की मग मुंबई, दिल्ली देशात कुठेही भाषा मात्र अस्सल गावरानच असते. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. (Paithan) त्यासाठी भुमरे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला विमानाने गेले. मत्री असल्यामुळे बिझनेस क्लासचा आरामदायक व लक्झरीयस प्रवास, त्यामुळे खाण्या-पिण्याचीही रेलचेल. (Shivsena) पण भुमरेंनी इथेही आपला साधेपणा दाखवून दिला.

विमानातले हायफाय जेवण सोडून त्यांनी घरून सोबत आणलेल्या डब्यातील चटणी-भाकरीलाच पसंती दिली. अगदी विमानात आपल्या सीटवर मांडी घालून बसत त्यांनी चटणी भाकरी खाल्ली आणि तृप्तीचा ढेकर दिला. राजकारण म्हटंल की विरोधकांकडून टीका, आरोप-प्रत्यारोप हे आलेच. अशावेळी संयम दाखवत वाटचाल करणारा व्यक्तीच यशस्वी होवू शकतो.

तसे भुमरे विरोधकांना देखील सडेतोड उत्तर देतात. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भुमरे यांना लक्ष्य केल्याचे पहायला मिळाले. वैयक्तिक आरोपांना तोंड देत भुमरे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले भुमरे आपल्या विमान प्रवासातील साधेपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in