Sandipan Bhumre : आमचं कुणीबी उभं राहूंन द्या, खैरेचं डिपाॅझीटच जप्त करू..

Shivsena : खैरेंना पक्षात कवडीची किंमत राहीली नव्हती, त्यांना मातोश्रीवर सुद्धा येवू देत नव्हते, खैरे स्वतःच हे सांगयाचे.
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, Aurangabad
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political : भाजपने मिशन लोकसभा हाती घेत मराठवाड्यातील औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. तर दुसरीकडे शिंदे गट मात्र यावर हाताची घडी तोंडावर बोटच्या भुमिकेत होती. पहिल्यांदाच शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक आम्हीच लढवणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.

Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, Aurangabad
Jalna News : रावसाहेब दानवे यांची तिसरी मुलगी राजकारणात ? पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर हजेरी..

मी असू द्या, नाहीतर अन्य कोणी लोकसभेला खैरेचं डिपाॅझीटच जप्त करू, असा दावा देखील भुमरे यांनी केला आहे. डा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर भुमरे माध्यमांशी बोलत होते. भाजपने (Aurangabad) औरंगाबादसह (Marathwada) मराठवाड्यातील अन्य मतदारसंघावर दावा केला होता.

यावर मागणी करण्यात गैर नाही, पण औरंगाबाद लोकसभा बाळासाहेबांची शिवसेनाच लढणार आणि जिंकणार देखील, असा विश्वास देखील भुमरे यांनी व्यक्त केला. भुमरे म्हणाले, निवडणुका म्हटलं की सगळेच राजकीय पक्ष तयारी करत असतात, आमची देखील तयारी सुरू आहे. शिंदेसाहेब ज्याला कुणाला लोकसभेची उमेदवारी देतील त्याला आम्ही निवडून आणू.

मला उमेदवारी दिली तर माझी लोकसभा लढवायची इच्छा आहे, पण शिंदेसाहेब सांगतील त्या उमेदवाराचे आम्ही काम करू आणि ही जागा निवडून आणू. चंद्रकांत खैरे समोर असू द्या, ते आमचं डिपाॅझीट जप्त करू म्हणतात, पण आम्हीच त्यांच डिपाॅझीट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. खैरेंना पक्षात कवडीची किंमत राहीली नव्हती, त्यांना मातोश्रीवर सुद्धा येवू देत नव्हते, खैरे स्वतःच हे सांगयाचे.

आमच्या उठावानंतर आता त्यांना थोडीफार किंमत आली आहे.जनतेमध्ये त्यांना कोणी विचारत नाही, पण मिडियानेच त्यांना मोठं केल, असेही भुमरे म्हणाले. भाजपने शिंदेसेनेचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांवर देखील दावा सांगितला आहे. दावा सांगणे किंवा मागणी करणे यात काही गैर नाही, मागणी केली पाहिजे, या मताची मी असल्याचेही भुमरे म्हणाले,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com