आठ दिवसांपासून शहरातला वीजपुरवठा खंडित; पण भुमरेंना काही घेणंदेणं नाही

Sandipan Bhumare| Paithan|आदित्य ठाकरे उद्या (२३ जुलै) पैठण दौऱ्यावर
Sandipan Bhumare|
Sandipan Bhumare|

पैठण : वीज बिल थकल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून महावितरणाने पैठण (Paithan) शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशात आज शिवसेनेचे (Shivsena) शहरप्रमुख तुषार पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. पैठण शहर हा मतदारसंघ हा बंडखोर आमदार संदीपान भूमरे यांच्या असल्याने आता भुमरे आणि शिवसैनिक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पैठण हे तीर्थक्षेत्र आहे. त्यात शहर अंधारात असल्याने वारकरी व पर्यटकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठांवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. मात्र या भागातील बंडखोर आमदार संदिपान भुमरे याबाबत कोणत्याही हालचाली करताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला. तसेच, येत्या दोन-तीन दिवसांत पथदिवे आणि हायमास्ट चालू झाले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Sandipan Bhumare|
सात शहरांच्या नामांतरास केंद्राची मंजुरी, पण औरंगाबाद, उस्मानाबादचा प्रस्तावच नाही ?

अशात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी (२३ जुलै) पैठणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकीकडे भुमरेंची बंडखोरी आणि दूसरीकडे आदित्य ठाकरेंचा पैठण दौऱ्याने शिवसैनिकांमध्येही ऊर्जा संचारली आहे. त्यामुळे या आंदोलनातून बंडखोर आमदार संदिपान भुमरे आणि मूळ शिवसैनिक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या संदिपान भुमरेंना आदित्य ठाकरेंच्या रडारवर असणार हेही निश्चित झाले आहे.

आज दुपारी (दि. 22) आदित्य ठाकरे औरंगाबादला पोहोचतील. शनिवारी (२३ जुलै) औरंगाबादमधील पैठण आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच त्याच दिवशी ते शिर्डीतही जाणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे रवाना होती.

शिवसंवाद यात्रेनिमीत्त शिवसेना नेते आदित्य ठाकरे ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते विविध ठिकाणी सभांना संबोधित करणार आहेत. शिवसनेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यापासून आदित्य ठाकरे संवाद यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहेत. याच दौऱ्यात ते संदीपान भुमरे यांच्या मतदार संघातही जाणार असल्याने आता ते काय बोलतात याकडे सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in