Sambhaji patil Nilangekar News : निलंगेकरांचा' नाद करायचा नाही, लुडबुड करणाऱ्यांना इशारा..

Marathwada : अरविंद पाटील यांनी स्वतःच्या नावाने पॅनल उभे करून सहकार क्षेत्रात ठसा उमटवल्याने राजकारणात त्यांचे 'लाँचिग' झाले.
Sambhaji Patil Nilangekar Latest News
Sambhaji Patil Nilangekar Latest NewsSarkarnama

Latur : `निलंगेकरांचा नाद करायचा नाही`, अशा शब्दात माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोधकांना इशारा दिला. (Latur) नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत निलंगेकर व त्यांचे बंधु अरविंद या जोडगळीने निलंगा, देवणी, औराद बाजार समित्यांमध्ये एकहाती सत्ता मिळवली. विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्यानंतर विजयी जल्लोष साजरा करतांना निलंगेकरांनी हा इशारा आपल्या राजकीय विरोधकांना दिला.

Sambhaji Patil Nilangekar Latest News
Sharad Pawar Retrirement : Vitthal Maniyar यांनी बघा पवरांच्या वारसदाराबद्दल काय म्हटले ?|Sarkarnama

निलंग्यात येवून लुडबूड करायची नाही, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे गढीवरच्या देशमुखांना लगावल्याची चर्चा लातूर जिल्ह्यात या निमित्ताने होत आहे. (Bjp)भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतःच्या नावाने पॅनल उभे करून सहकार क्षेत्रात ठसा उमटवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे 'लाँचिग' झाले आहे. शिवाय या नेतृत्वाला भरभरून अशिर्वाद द्या,असे साकडेही त्यांचे बंधु आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) यांनी जनतेला घातले.

निलंगा व औरादशहाजानी बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भाजपाने नियोजन केले होते तर महाविकास आघाडीचा ताळमेळ शेवटपर्यंत लागत नव्हता. (Marathwada) निलंगा विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अन् आमदारकीचे स्वप्न पडू लागलेले संभाव्य दावेदार बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना हरवण्याची हीच योग्य वेळ आहे, हे ओळखून निलंगेकर बंधूनी नियोजन केले होते.

त्यामुळेच विरोधकांचा व पक्षातील स्वकीयाचाही धुराळा उडवण्यात त्यांना यश आले. जिल्ह्यात राजकीय परिवर्तन फक्त निलंगेकरच करू शकतात. माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसला मोठा धक्का लोकसभा निवडणूकीत २००४ ला दिला होता.

मागील पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपने जिल्हापरिषद, पंचायत समित्या, लातूर महानगरपालिका या माध्यमातून मोठे यश प्राप्त करून सत्ता ताब्यात घेतली त्यामुळे निलंगेकरांचा नाद करायचा नाही, असे देशमुखांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com