Sambhaji Nagar Riot : छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी मोठी अपडेट समोर..

Chhatrapati Sambhaji Nagar Riot : राज्यपालांनी थेट प्रसिद्धी निवदेन दिले..
Chhatrapati Sambhaji Nagar Riot :
Chhatrapati Sambhaji Nagar Riot :Sarkarnama

Chhatrapati Sambhaji Nagar Riot : छत्रपती संभाजीनगर मधील दंगलीप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी पवार (Sambhaji Pawar) हे याबाबतीत मुख्य तपास अधिकारी असतील.

या दंगलीसंदर्भातला सगळा सविस्तर तपास आता केला जाणार आहे. पोलीस (Police) आय़ुक्ताकडून आता या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत आता राज्यपालांनी काही सूचना केल्याचे वृ्त्त आहे.

दरम्यान, शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल बैस यांनी फोनवरून चर्चा केली आहे. राजभवनामधून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे की, रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्शवभूमीवर आज राजपाल रमेश बैस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Riot :
Pimpri-Chinchwad : खंडणीच्या गुन्ह्यात एसीपीसह हवालदाराला दिलासा! तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

यापकरणात जे हिंसक घटना घडलेल्या आहेत, दंगल परिस्थिती निर्माण झालेली आहे. दंगलखोरांवर कडक कारवाई करावी, यासंबंधी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याचं प्रसिद्धी निवेदनात सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटांत बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर तुफान राड्यात झालं. यानंतर वाद विकोपाला गेला आणि हाणामारी, दगडफेकीसह पोलिसांच्या आणि खासगी मिळून, अशा एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com