Sambhaji Bhide Meet Manoj Jarange : तुमच्या लढ्याला यश मिळेल, पण उपोषण मागे घ्या; संभाजी भिडेंचे मनोज जरांगेंना आवाहन

Maratha Reservation : गेल्या १५ दिवसांपासून जरांगे उपोषण करत आहेत.
Sambhaji Bhide Meet Manoj Jarange
Sambhaji Bhide Meet Manoj Jarange Sarkarnama

Jalna News : 'मनोज जरांगेच्या लढ्याला नक्कीच यश येणार. शिंदे-फडणवीस आणि पवार हे धुरंधर नेते आहेत. त्यांची मागणी नक्कीच पूर्ण होईल. पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं,' असं आवाहन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केलं. याचवेळी त्यांनी जरांगे यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचही जाहीर केलं.

संभाजी भिडे यांनी आज आंदोलनस्थळी जरांगे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जरांगेंची समजूत काढत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्यासोबत आमदार संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर हेदेखील त्यांच्यासोबत होते. तसेच संभाजी भिडे यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

Sambhaji Bhide Meet Manoj Jarange
Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

या वेळी माध्यमांशी संवाद साधताना संभाजी भिडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार काळजी असलेला माणूस आहे. तुमच्या मागण्याही १०० टक्के योग्यच आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण तुम्ही उपोषण थांबवा आणि लढा सुरूच ठेवा, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्यात आम्हीही तुमच्या सोबत आहोत.

राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे, पण तोही शेवाळावरून चालण्यासारखा आहे. ते राजकारणी आहेत म्हणून त्यांना घाबरू नका. ते जो शब्द देतील ते पाळून घेण्याचं माझं काम. तुमची जी लढाई आहे, जो आग्रह आहे ती लढाई १०० टक्के यशस्वी होणार. हे जे चाललंय ते जगाच्या कल्याणासाठी चाललंय. मराठा समाज हा हिंदुस्थानच्या पाठीचा कणा आणि आत्मा असलेला समाज आहे.

पण माझी विनंती आहे की, आपण हे उपोषण थांबवावं. जिजामाता, छत्रपती शहाजी राजेंचा माझ्याकडून आलेला तुम्हाला निरोप आहे. जगात सगळे खोटं बोलतात, पण आई कधी खोटं बोलत नाही, हा जिजाऊंचा निरोप आहे असं समजा आणि उपोषण मागे घ्या, असा पुनरुच्चार करत त्यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Sambhaji Bhide Meet Manoj Jarange
Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in