महिला सरपंच परिषदेत ग्रामसेवकांचा `भामटा`, असा उद्धार; शिवसेना आमदार अडचणीत

(Shivsena Mla Sanjay Sirsath) ग्रामसेवक हा सर्वात भामटा असतो, त्यांच्यापासून सावध राहून महिला सरपंचांनी काळजी घ्यायला हवी.
Shivsena Mla Sanjay Sirsath
Shivsena Mla Sanjay SirsathSarkarnama

औरंगाबाद ः शिवसेनेने भरवलेल्या महिला सरंपच परिषदेत आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांचाच उद्धार केला. ग्रामसेवक हा सर्वात भामटा असतो, त्याच्यापासून सावध राहा, असा सल्ला शिरसाट यांनी महिला सरंपचांना दिला. यावरून आता ग्रामसेवकांमध्ये संतापाचे वातावरण असून या विधानाचा निषेध आणि माफीच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

महिला सरपंचांना मोकळेपणाने काम करता यावे, त्यांना आपल्या अधिकारांची, सरकारी योजनांची माहिती होऊन त्या सक्षम व्हाव्यात, त्यांच्या कारभारात इतरांची लूडबूड होऊ नये या हेतून शिवसेनेच्या वतीने काल औरंगाबादेत महिला सरंपच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषेदला शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थीत होते. पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात काही अनुभव सांगतांना ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. तो करतांना ग्रामसेवक हा सर्वात भामटा असतो, त्याच्यापासून महिला सरंपचांनी सावध राहावे, तुमच्या आदेशाचे त्याने पालन केले पाहिजे, असेही त्यांनी सूचवले.

परंतु त्यांच्या या विधानामुळे आता नवाच वाद निर्माण झाला आहे. संजय शिरसाट यांनी आपल्या विधानाबद्दल राज्यातील तमाम ग्रामसेवकांची माफी मागावी अशी मागणी करत ग्रामसेवक संघटनांनी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.

संजय शिरसाट यांनी मात्र आपण सरसकट सगळ्या ग्रामसेवकांबद्दल बोललो नव्हतो. माझ्या मतदारसंघात मला असा अनुभव अनेकदा आलेला आहे, त्यामुळे महिला सरंपचांना मी माझा अनुभव सांगितला.

माझे विधान हे सगळ्या ग्रामसेवकांसाठी नव्हते. जे तसे वागतात त्यांना ते लागू होते. राज्यात अनेक ग्रामसवेक चांगले काम करतात, त्यांचा सत्कार देखील केला जातो, त्यांना हे विधान लागू पडत नाही, त्यांनी या बद्दल वाईट वाटून घेऊ नये, असे आवाहन देखील शिरसाट यांनी केले.

Shivsena Mla Sanjay Sirsath
खासदार चिखलीकर पोटनिवडणुकीच्या पराभवावर बोलेच ना

काय म्हणाले होते शिरसाट

ग्रामसेवक हा सर्वात भामटा असतो, त्यांच्यापासून सावध राहून महिला सरपंचांनी काळजी घ्यायला हवी. वित्त आयोगाचे पैसे आले, ते आपण इथे खर्च केले तर फायदा होईल असे सांगून तो आपल्याला तर फसवतोच. वर ग्रामंपचायत सदस्यांना मी तर सरपंचांच्या सांगण्यावरून हे केले असे सांगून स्वतःची कातडी वाचवतो, अशा शब्दात शिरसाट यांनी ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com