Sachin Ahir On Farmers : पंचनामेच होत नाही, तर शेतकऱ्यांना मदत कधी करणार ?

Marathwada : पैठण तालुक्यातच अवकाळी पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण झालेले नाही. पालकमंत्र्यांची संवेदना कुठे गेली?
Mla Sachin Ahir News
Mla Sachin Ahir NewsSarkarnama

Shivsena (UT) : सर्वत्र अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नुकसानीचे अद्याप पंचनामेच सुरू झालेले नाही. मदतीच्या नुसत्याच घोषणा होतात, चर्चा होते, पण पंचनामेच होत नसेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार ? असा प्रश्‍न शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी केला.

Mla Sachin Ahir News
Ajit Pawar Poster News : पवारांच्या अध्यक्षपदावरून खळबळ अन् इकडे परळीत पुन्हा अजित पवारांचे बॅनर..

पालकमंत्र्यांच्या पैठण तालुक्यातच अनास्था असून, (Affected Farmers) शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विधीमंडळात सरकारला जाब विचारू, असा इशारा त्यांनी दिला. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. (Shivsena) यावेळी पत्रकारांशी बोलतांना अहिर म्हणाले, जिल्ह्यातील पैठण, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अद्याप सर्वेक्षण झालेले नसेल तर सरकार शेतकऱ्यांना मदत कधी देणार ? पालकमंत्र्यांच्या पैठण तालुक्यात कृषी अधिकारी भेटला नाही. (Marathwada) क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार आहे. पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रभारी आहेत. पालकमंत्र्यांच्या तालुक्याची अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणचे काय? असा प्रश्‍न आहिर यांनी केला. पैठण तालुक्यातच अवकाळी पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण झालेले नाही. पालकमंत्र्यांची संवेदना कुठे गेली? असा सवालही अहिर यांनी केला.

औद्योगिक क्षेत्रात देखील चित्र समाधानकारक नाही. डीएमआयसीमध्ये सर्व सुविधा असलेली साडेचार हजार हेक्टर जमीन तयार आहे, पण याठिकाणी उद्योग येण्यास तयार नाहीत. ज्यावेळी डीएमआयसीसाठी जमिनीचे भूसंपादन केले जात होते, त्यावेळी मी उद्योग राज्यमंत्री होतो. या भागात ग्रीन एनर्जी इंन्डस्ट्रीज होणार असे आश्‍वासन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पण हा प्रकल्प कुठे गेला? हे अद्याप कळलेले नाही.

दोवासमध्ये विविध कंपन्यासोबत करार झाल्याचे शासनातर्फे सांगितले जात आहे. यातील किती कंपन्या डीएमआयसीमध्ये येणार? असा प्रश्‍न शासनाला विचारणार असल्याचे आहिर म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, याविषयीचे चित्र आगामी दोन दिवसात स्पष्ट होईल. पुण्याची वज्रमूठ सभा रद्द होणार नाही, ती लांबणीवर पडू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com