Sachin Ahir In kannad News : कन्नड शिवसेनेचा बालेकिल्लाच ; अहिरांनी घातली आमदारांच्या दुःखावर फुंकर..

Marathwada : ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ते आज स्वार्थासाठी, खोके घेऊन गद्दार झाले.
Sachin Ahir In kannad News
Sachin Ahir In kannad NewsSarkarnama

Shivsena : कन्नड मतदार संघ हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता, आहे आणि राहिल, अशा शब्दांत ठाकरे गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आमदार उदयसिंह राजपूत यांच्या दुःखावर फुंकर घातली. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत उदयसिंह राजूपत यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलचा दारूण पराभव झाला.

Sachin Ahir In kannad News
Sambhaji patil Nilangekar News : निलंगेकरांचा' नाद करायचा नाही, लुडबुड करणाऱ्यांना इशारा..

नागद या राजपूत यांच्या गावातच त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे आमदार राजपूत (Udaysingh Rajput) यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. अशावेळी उपनेते सचिन अहिर यांनी कन्नडमध्ये (Kannad) येवून हा मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे सांगत राजपूत यांना धीर दिला आहे.

अहिर यांनी नुकतीच उदयसिंह राजपूत यांच्या कन्नडमधील संपर्क कार्यालयाला भेट दिली, तसेच विविध विकासकामांचे उद्धाटन व भुमीपूजन केले. (Shivsena) यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सचिन अहिर म्हणाले, ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ते आज स्वार्थासाठी, खोके घेऊन गद्दार झाले आहेत. मात्र कन्नड तालुक्यातील आमदार उदयसिंग राजपूत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे कन्नड- सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे, यापुढे देखील राहील. थोड्याशा पराभवाने खचून जाण्याची गरज नाही, असे प्रसंग येत असतात. शिवसेना नेहमीच संकटातून एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर आलेली आहे. दरम्यान, अहिर यांच्याहस्ते बनशेंद्रा लजीवन मिशन योजना अंतर्गत पाईपलाईन, विहीर खोलीकरण, पाणी टाकी आदी १७१ लक्ष रुपये कामांचा शुभारंभ झाला. तसेच सितानाईक तांडा येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com