सत्ताधारी लोकप्रतिनीधी, मंत्र्यांना कोटीचा निधी, भाजप आमदारांची लाखांवर बोळवण..

माझ्यासह आमदार हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांना फक्त लाखांचा निधी या योजने अंतर्गत देण्यात आला. ( Bjp Mla Atul Save)
Subhash Desai- Atul Save
Subhash Desai- Atul SaveSarkarnama

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत केल्या जाणाऱ्या निधी वाटपात शासनाने केलेल्या पक्षपाताबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निषेध नोंदवत भाजप (Atul Save)आमदारांनी सभा त्याग केला. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सभात्यागाबाबत प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडतांना भाजपा आमदार अतुल सावे म्हणाले, ज्यांचा या निधीवर अधिकार नाही, त्या राजेश टोपे, अमित देशमुख, मानिषाताई कायंदे, चंद्रकांत खैरे यांना कोटींचा निधी देण्यात आला. (Subhash Desai) याविपरीत ज्या लोकप्रतिनिधींना हा निधी द्यावयास हवा, त्या लोकप्रतिनिधींना फार तोकड्या स्वरूपात निधी देऊन त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांवर राज्य सरकारने अन्याय केला आहे. (Aurangabad)

शासनाच्या या पक्षपाती भूमिकेकडे आम्ही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. म्हणून आम्ही सभात्याग केला. शिवसेना आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल यांना प्रत्येकी तीन कोटी, चंद्रकांत खैरे यांना अडीच कोटी तर मनीषा कायंदे यांना एक कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

Subhash Desai- Atul Save
Amit Deshmukh : देशात, राज्यात जे चाललंय त्यावर बोलणार नाही, आम्ही विकासावर बोलतो..

तर माझ्यासह आमदार हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांना फक्त लाखांचा निधी या योजने अंतर्गत देण्यात आला. हा दुजाभाव असून यामुळे आमच्या मतदारसंघातील नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, असे सावे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे तसेच जिल्ह्यातील सर्वच विधानसभा सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com