महापालिका निवडणुकीसाठी रासपने कंबर कसली ; आमदार गुट्टे-देशमुख एकत्र

स्वच्छ प्रतिमा व काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवारांना पॅनलद्वारे निवडणुकीची संधी देवून संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविली जाईल. (Mla Ratnakar Gutte)
Mla Ratnakar Gutte
Mla Ratnakar GutteSarkarnama

परभणीः परभणी महापालिका (Parbhani Municipal Corporation) निवडणुकीचे वेध लागले असतांनाच येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल मैदानात उतरणार आहे. या निवडणुकीसाठी नुकतेच काॅंग्रेसमधून (Congress) बाहेर पडलेले विद्यमान नगरसेवक सचिन देशमुख यांना आमदार गुट्टे (Mla Ratnakar Gutte) यांची साथ असणार आहे. स्वच्छ प्रतिमा व काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवारांना पॅनलद्वारे निवडणुकीची संधी देवून संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविली जाईल, असे गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

परभणी महापालिकेतील कॉग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा कॉग्रेसकडे दिला आहे. सत्ताधारी कॉग्रेस लोकहिताची कामे करत नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगत सचिन देशमुख यांनी पक्ष सोडला होता. त्याचवेळी सचिन देशमुख यांना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे पाठींबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानुसार गुरुवारी गुट्टे यांनी या संदर्भात माहिती दिली.

गुट्टे म्हणाले, परभणी महापालिका ही महापालिका आहे का असा प्रश्न पडतोय? शहराचा विकास सोडून केवळ सेटलमेंटचे राजकारण सत्ताधारी पक्षासह इतर सर्वच पक्षांकडून होत आहे, महापालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही. आपण स्वतः या शहरातील विकास कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.

त्यामुळे आमच्याकडे शहर विकासाचे व्हिजन असल्याने आम्ही शहराचा विकास निश्चित चांगल्या प्रकारे करू शकतो. सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल या निवडणुकीत उभे केले जाईल. आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षासी आम्ही युती - आघाडी करणार नाहीत, शहरातील सर्व जागा स्वबळावर लढवू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mla Ratnakar Gutte
ईडीच्या कारवाईनंतर दानवे-खोतकर संघर्ष भडकणार?

याआधी परभणीतील जुन्या, अनुभवी नेत्यांनी ज्या मोठ - मोठ्या इमारती बांधल्या त्या इमारतीची देखभाल दुरुस्तीच सत्ताधारी करू शकत नाहीत. तर ते शहराचा विकास काय करणार? तेच तेच चेहरे निवडणुकीत निवडून येतात व सेटलमेंटचे राजकारण सुरु होते. हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी आम्ही विकासाची जाण असणारे अनुभवी व तरूण युवकांना संधी देणार आहोत. विकासाचा अजेंडा घेवून ही निवडणुक लढविली जाईल असे सचिन देशमुख यांनी सांगितले.

६५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत काॅंग्रेसची सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. शिवसेना-भाजप मर्यादित असतांना आता रासपने देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील रंगत अधिक वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com