मराठवाड्यातील रस्ते विकासाचा वेग मंदावला, बांधकाम मंत्र्यांचीच कबुली

मराठवाड्यातील रस्ते तयार करणाऱ्या अठरा एजन्सीज अपयशी ठरल्या आहेत हे मान्यच करावे लागेल. (Ashok Chavan)
मराठवाड्यातील रस्ते विकासाचा वेग मंदावला, बांधकाम मंत्र्यांचीच कबुली
PWD Minister Ashok ChavanSarkarnama

परभणी ः गेल्या काही महिन्यांपुर्वी झालेली अतिवृष्टी, पूर आणि गारपीटीमुळे राज्यासह मराठवाड्यातील (Marathwada) रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात पूल आणि रस्त्यांचे नुकसान झाल्याचे खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले होते. (PWD) मात्र या रस्त्यांची दुरस्ती व नवी कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची कबुली आणि खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

परभणी-गंगाखेड दौऱ्यावर असलेल्या चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना राज्यात विशेषतः मराठवाड्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गतीबद्दल नाराजी व्यक्त केली. अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्यातील रस्ते तयार करणाऱ्या अठरा एजन्सीज अपयशी ठरल्या आहेत हे मान्यच करावे लागेल. त्यामुळेच मराठवाड्याच्या रस्त्यांच्या बांधकामाची गती मंदावली आहे.

गंगाखेड येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण करतांना चव्हाण यांनी कंत्राटदारांच्या कामाच्या वेगाबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या ८ वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते, तीन मुख्यमंत्र्यांची टर्म पाहणाऱ्या गंगाखेड शहरातील या बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे लोकार्पण आज अखेर चव्हाण यांच्या हस्ते झाले . गंगाखेड -नांदेड रस्त्यावरील ४४० मीटर लांबीचा हा पूल सामान्यांसाठी खुला झाला.

पुलाच्या उद्घाटनानंतर बोलतांना चव्हाण यांनी राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जनतेने कोरोनाचे नियम कठोरपणे पाळले तर लॉकडाऊन लावायची वेळ येणार नाही. आज उद्घाटनाचा कार्यक्रम छोटेखानी घेण्यास सांगितले. कोरोनाचे बंधन असल्यामुळे छोटेखानी कार्यक्रम घेतला त्यामुळे सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन देखील केले.

PWD Minister Ashok Chavan
शिवसेना नेते खैरे राज्यपालांना भेटले, भगवी शाल देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या...

ओबीसी आरक्षणावर भाष्य करतांना ते म्हणाले, केंद्र सरकारने आम्हाला जर एम्पिरिकल डेटा दिला असता तर ओबीसी आरक्षणासाठी फायद्याचा ठरला असता. मात्र केंद्राकडून आम्हाला डेटा मिळाला नाही. आता एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. जोपर्यंत इमपीरिकल डेटा उपलब्ध होत नाही तो पर्यंत स्थिती स्पष्ट होणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in