Municipal Corporation News, Aurangabad
Municipal Corporation News, AurangabadSarkarnama

आरक्षण सोडतीवर टांगती तलवार, महापालिकेला आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा

सध्याची प्रभाग रचना १२६ वॉर्डांची आहे. ११५ वॉर्ड झाल्यास प्रभागांचे क्षेत्रफळ वाढणार आहे. मतदारांची संख्येतही वाढ होईल. (Municipal Corporation)

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. पाच) आरक्षण सोडत काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. (Aurangabad) पण बुधवारी (ता. तीन) रात्री राज्य शासनाने नगरसेवकांची वाढीव संख्या कमी करण्याचा व चार वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाचे आज सायंकाळी उशिरापर्यंत आदेश प्राप्त न झाल्याने शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्याची तयारी (Municipal Corporation) महापालिकेच्या निवडणूक विभागाने केली असल्याचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले.

महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. (Marathwada) तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविली होती. त्यानुसार १२६ नगरसेवकांची संख्या झाली होती. त्यानुसार ४२ प्रभाग तयार करून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली.

नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी संत एकनाथ रंग मंदिरात आरक्षण सोडत काढली जाणार होती. पण बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांची वाढीव संख्या कमी करण्याचा व एका चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार आता महापालिकेत ११५ नगरसेवकच राहणार आहेत.

Municipal Corporation News, Aurangabad
मंत्रीमंडळ विस्तार : तारीख पे तारीखमुळे इच्छुकांनाही विश्वास बसेना..

यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त संतोष टेंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही शुक्रवारच्या आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण करून ठेवली आहे. त्यानुसार उद्या आरक्षण सोडत काढण्यात येईल. दरम्यानच्या काळात आयोगाकडून काही सूचना मिळाल्यास ही सोडत काढली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

राज्य शासनानाच्या बुधवारच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश प्राप्त झाल्यास सर्वच प्रक्रिया महापालिकेला नव्याने राबवावी लागणार आहे. सध्याची प्रभाग रचना १२६ वॉर्डांची आहे. ११५ वॉर्ड झाल्यास प्रभागांचे क्षेत्रफळ वाढणार आहे. मतदारांची संख्येतही वाढ होईल. नव्याने प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in