राऊतांच्या घरी ईडीचा छापा; एकनाथ शिंदे म्हणतात, ‘आपल्याला इकडे मोठी कारवाई करायचीय...’

संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
Eknath Shinde -Sanjay Raut
Eknath Shinde -Sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी आज सकाळपासून ईडी (ED) चौकशी करण्यात येत आहे. त्याविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) संताप व्यक्त केला जात आहे. या ईडीच्या छापेमारीसंदर्भात औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वक्तव्य आले आहे. ‘आपल्याला ईकडे विकास कामासंदर्भात मोठी कारवाई करायची,’ असे म्हणून त्यांनी या छापेमारीकडे दुर्लक्ष केले. (Regarding the ED action against Sanjay Raut, Chief Minister Eknath Shinde said)

सक्तवसुली संचनालयाचे (ईडी) एक पथक शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर आज ईडीचे पथक दाखल झाले आहे. तब्बल पाच तासांपासून राऊत कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीचं पत्राचाळ प्रकरणात ईडीने खासदार राऊत यांना समन्स बजावला होता. ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Eknath Shinde -Sanjay Raut
थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांवर असा आणता येणार अविश्वास ठराव!

दरम्यान, औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की इकडे विकासाच्या संदर्भात आपल्याला मोठी कारवाई करायाची आहे. विकास प्रकल्पासंदर्भात ती आपल्याला करायची आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde -Sanjay Raut
संजय राऊतांवरील कारवाईही ब्लॅकमेल करण्यासाठी...

कुटुंबीयांसमवेत संजय राऊत घरी आहेत. त्यांची अनेक प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. "मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही," असे ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी म्हटले होते. ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज ईडीची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

Eknath Shinde -Sanjay Raut
शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी धोका नाही, भाजप-अपक्ष मिळून सरकार बनवू : बच्चू कडू

ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र तपासण्याचे काम सुरू आहे. आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in