बंडखोर आमदारांमध्ये मुंबईत शक्तीप्रदर्शनाची स्पर्धा ; शुक्रवारी सत्तारही समर्थकांसह जाणार..

पंरतु ही गर्दी आणि शक्तीप्रदर्शन त्यांना मंत्रीपद मिळवून देणार का? हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, सत्तार यांचे हजारो समर्थक उद्या, गुरुवार १४ रोजीच मुंबईत दाखल होणार आहेत. (Mla Abdul Sattar)
Ex.Minister Mla Abdul Sattar,News
Ex.Minister Mla Abdul Sattar,NewsSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटातील आमदारांमध्ये मुंबईत जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. दररोज एकतरी आमदार आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी काल शकडो समर्थकांसह मुंबई गाठत एकनाथ शिंदे यांच्यासमोर परेड केली. त्यानंतर उद्या, (Aurangabad) औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांकडे आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत.

यात आणखी एका नावाची भर पडली असून माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील शुक्रवारी आपण हजारो समर्थकांसह मुंबईत जाऊन (Eknath shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सत्तार यांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत नेण्यासाठी खाजगी बसेसची व्यवस्था केली असून पदाधिकाऱ्यांना त्यांनी `चलो मुंबई`चे आवाहन देखील केले आहे.

शिंदे यांच्या बंडाला मराठवाडा विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातून चांगलेच बळ मिळाले होते. जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला साथ देत सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी सफर केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर पुढील सुनावणीपर्यंत निलंबनाची कारवाई करू नये असे आदेश नुकतेच सुप्रीम कोर्टाने दिले, त्यामुळे बंडखोर आमदार भलतेच फाॅर्मात आले आहेत.

आता मंत्रीमंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असे समजून प्रत्येकाने मंत्रीपदासाठी जोर लावायला सुरूवात केली आहे. शिरसाट उद्या तर सत्तार परवा मुंबईत समर्थकांसह डेरेदाखल होत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुल व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री राहिलेले अब्दुल सत्तार आता कॅबिनेटची आशा बाळगून आहेत. पण काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांच्या मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांना मार्गी लावून त्यासाठी चारशे ते पाचशे कोटींचा निधी मंजुर केला.

Ex.Minister Mla Abdul Sattar,News
Aurangabad : आमदार शिरसाटांचे मंत्रीपदासाठी मुंबईत शक्तीप्रदर्शन ?

सत्तार यांनी देखील आपल्या राजकीय आयुष्यातील हा सर्वाधिक निधी असल्याचे सांगत आपल्या मंत्रीपदाची आशा नाही, कार्यकर्ता हेच आपल्यासाठी मोठे पद असल्याचे म्हटले होते. मात्र मंत्रीपदाच्या रेसमध्ये आपणही आहोत, हे दाखवत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. सभा, रॅली, मेळावा कुठल्याही कार्यक्रमाला गर्दी जमवण्यात सत्तार यांचा हातखंडा आहे. त्यामुळे मुंबईत इतर कुणापेक्षाही सत्तार जास्त गर्दी जमवतील एवढे मात्र निश्चित.

पंरतु ही गर्दी आणि शक्तीप्रदर्शन त्यांना मंत्रीपद मिळवून देणार का? हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, सत्तार यांचे हजारो समर्थक उद्या, गुरुवार १४ रोजीच मुंबईत दाखल होणार आहेत. शुक्रवारी १५ रोजी ते सत्तार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिंदे यांनी शुक्रवार रोजी दुपारी सत्तार समर्थकांना वेळ दिली असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in