Prakash Ambedkar News: दलित एकात्मतेसाठी आठवलेंची आंबेडकरांना 'ही' नवी ऑफर !

Ramdas Athawale: नरेंद्र मोदींचा सामना करणे येड्या गबाळ्याचे काम नाही
Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Ramdas Athawale, Prakash AmbedkarSarkarnama

Ramdas Athawale and Prakash Ambedkar: डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व गटांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना वारंवार निमंत्रण देऊनही ते ऐकत नाहीत. त्यांनी आणि मी एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी मी दोन पावले मागे येण्यास तयार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

बीड येथे आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना एकत्र येण्यासाठी खुली ऑफर दिली. ते म्हणाले, "मी अनेकवेळा निमंत्रण दिले मात्र प्रकाश आंबेडकर येत नाहीत. त्यामुळे चर्चा होत नाहीत. त्यांनी ऐकले तर स्वागतच आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची माझी तयारी आहे. माझी दोन पावले मागे येण्याची तयारी राहील. परंतु प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. तसेच एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष असा नारा देणे अत्यंत आवश्यक आहे. शेकडो गट करून आपल्याला बाबासाहेबांचे स्वप्न साकार करता येणार नाही. त्यासाठी एकच पक्ष आपला असावा. त्या पद्धतीचा निर्णय सर्वजण घेत असतील तर माझी तयारी आहे."

Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Ramdas Athawale : ''...म्हणून शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं!''; आठवलेंचं मोठं विधान

यावेळी आठवले यांनी आंबेडकर आणि मी एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे सांगितले. आठवले म्हणाले, "चर्चा करून विषय मार्गी लागत नाही. प्रकाश आंबेडकर ऐकण्याबाबत नेहमीच नकारात्मक असतात. ते आल्याशिवाय पहिले पाऊल पडणार नाही. मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र असावे, अशी जनतेची इच्छा आहे. भविष्यात तसे घडत असेल तर माझी तयारी आहे."

आठवले यांनी ठाकरे गट आणि आंबेडकरांच्या युतीबाबतही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, "प्रकाश आंबेडकारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटासोबत युती केली असली तरी ती कितपत टिकेल, याची शाश्वती नाही. ते ठाकरेंसोबत गेलेत महाविकास आघाडीसोबत नाही. उद्या महाविकास आघाडीतही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी मिळून महाराष्ट्रात फार मोठी ताकद निर्माण केली आहे."

Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Sharad Pawar News : कांद्याची निर्यात सुरू करून, शेतकऱ्यांना मदत करा : शरद पवारांनी सरकारला सुनावले !

यावेळी आठवले यांनी नरेंद्र मोदींचेही (Narendra Modi) कौतुक केले. ते म्हणाले, "मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा फार मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. आता नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीनही राज्यात एनडीएचे सरकार आलेले आहे. तसेच येणाऱ्या कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल किंवा इतर राज्याच्या निवडणुकीतही भाजप आणि एनडीएचे सरकार आणण्याचा प्रयत्न राहील. नरेंद्र मोदी 'स्ट्राँग' नेते आहेत. त्यांच्याविरोधात कितीही नेते उभे राहिले तरी त्यांचा सामना करणे येड्या गबाळ्याचे काम नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com