Ratnakar Gutte: ''..तर मला आत्महत्या करावी लागली असती!''; आमदार गुट्टेंनी सांगितली 2019 ची आपबीती

Ratnakar Gutte: ''तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस आयुष्य जगतोय...''
Ratnakar Gutte
Ratnakar Gutte Sarkarnama

Ratnakar Gutte Latest News : ''मी कधी खोटं कधी बोलत नाही आणि बोलणारही नाही. पण तुम्ही मला निवडून दिलं म्हणून बोनस आयुष्य जगतोय. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे. पण निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्याच करावी लागली असती'' असं विधान परभणीचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे ( Ratnakar Gutte) यांनी केलं आहे.

Ratnakar Gutte
Sanjay Raut : ..शिंदे गटाचे लोकं काय धुणीभांडी करायला ठेवणार का ? ; राऊतांचा टोला

आमदार रत्नाकर गुट्टे हे पूर्णा येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळची आपबीती सांगितली. गुट्टे म्हणाले,एका परिवारातील भाऊ, बहिणीप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात. माझं जगणं मरणं जे काही आहे, ते या परिवारासाठीच आहे. तुम्ही मला जीवदान दिलं आहे. पण 2019 ला निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती असंही गुट्टे यांनी यावेळी सांगितले.

तसेच मी खोटं कधी बोलत नाही. बोलणार नाही. तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस जगतोय. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे असं भावनिक वक्तव्य गुट्टे यांनी केलं आहे.

Ratnakar Gutte
Narenda Modi दिल्लीत एक बटण दाबतात, अन् १२ कोटी लोकांना १५ सेकंदात पैसे पोहोचतात...

शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप अन्...

विधानसभेच्या निवडणुकीआधी गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीवेळी गुट्टे तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन नाकारला असतानाही त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आणि त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in