Kannad APMC News : कन्नडच्या सभापतीपदी राठोड, तर बोरसे उपसभापती पदी बिनविरोध..

Shivsena : या निवडणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विशेष लक्ष घातले होते.
Kannad APMC News
Kannad APMC NewsSarkarnama

Marathwada : कन्नड बाजार समिती सभापती, (Kannad APMC News) उपसभापती पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. सभापती पदी शिंदे गटाचे डाॅ. मनोज राठोड तर उपसभापती पदी संजना जाधव यांच्या गटाचे जयशे बोरसे यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार स्वतः निवडणुकीच्यावेळी कन्नडमध्ये ठाण मांडून होते. राठोड आणि बोरसे यांचे अब्दुल सत्तार, संजना जाधव, नितीन पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

Kannad APMC News
Chhatrapati Sambhajinagar APMC : विरोधकांकडून आरोप, तरी सभपती पदासाठी बागडेंचा पठाडेंवरच विश्वास..

कन्नड (Kannad) बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार नितीन पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी एकित्रपणे तयार केलेल्या शिवशाही शेतकरी पॅनलने सगळ्यांना धूळ चारत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला होता.

तर ठाकरे गटाचे एकनिष्ठ आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांच्या पॅनलला या निवडणुकीत सपशेल पराभव पत्करावा लागला होता. तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadahav) यांच्या पॅनलची मात्र या निवडणुकीत पुरती हाराकिरी झाली होती. त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

भाजप व कॉंग्रेस पक्षाने एकत्र येऊन उतरवलेल्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार किशोर पवार हे एकमेव ४१४ मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विशेष लक्ष घातले होते.

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह आम आदमी, स्वाभीमानी शेतकरी संघटना, भाजप-काॅंग्रेस आणि शिंदे गट- संजना जाधव यांचे शिवशाही शेतकरी पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com