
दिल्ली : आधी ठाकरे सरकारने आणि आता नव्याने शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव असे करण्याचा निर्णय जाहीर केला. हा प्रस्ताव आता केंद्राकडे जाईल आणि त्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र या नामांतराच्या विषयावरून अजूनही राजकारण सुरूच आहे. (Imtiaz Jalil) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव बदलण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासाठी रस्त्यावर आणि न्यायालयात देखील आपली लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. दानवे म्हणाले, औरंगजेब हा एक क्रूर राजा होता, त्याने महाराष्ट्रावर आणि येथील जनतेवर अन्वीनत अत्याचार केले. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांना कैदेत ठवेत ठार मारले. (Marathwada) त्यामुळे मुस्लिम समाजात देखील कोणी आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मला एकही असे उदाहरण दाखवा, असे आव्हान देत मग एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का? असा सवाल केला आहे.
आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा आणि मग छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा? असा टोला देखील दानवे यांनी लगावला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मंत्रीमंडळ बैठकीत तसा प्रस्वात मंजुर करण्यात आला होता. मात्र नंतर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने हा निर्णय आम्हाला माहितच नव्हता, तो मान्य नाही अशी सोयीची भूमिका घेतली. पण कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय माहित नाही, असे सांगत या दोन्ही पक्षांनी खोटारडेपणा केला.
परंतु शिंदे यांच्यासह ५१ आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यामुळे अशा अल्पमतातील सरकारला कुठलाच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने तो नव्याने सुधारणा करत घेतला. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आमची देखील होती, असेही दानवे यांनी सांगितले.
आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा ठराव नव्या सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत मंजुर केल्यानंतर पुन्हा काही जणांना पोटदुखी सुरू झाली आहे. यातूनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या नावाला विरोध करायला सुरूवात केली आहे. माझे त्यांना आव्हान आहे, आधी त्यांनी आपल्या समाजातील मुलांची नावे औरंगजेब ठेवावीत, मग विरोध करावा. पण आतापर्यंत मुस्लिम समाजात कोणी आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? मग यांना औरंगजेबाबद्दल एवढे प्रेम, पुळका कशासाठी? असा सवाल देखील दानवे यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.