राजकारणात अनेकांना चकवा देणारे रावसाहेब दानवे पाक कलेतही तरबेज

(Central Railway State Minister Raosaheb Danve) शेतात गाय-म्हशीचे दूध काढणे, औत हाकणे, ट्रॅक्टरने नांगरणी, बुलेट, घोड्याची सवारी असो की मग हातावर भाकरी घेऊन ठेचा खाणे या त्यांच्या हटके पण साधेपणाची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते.
Central Railway State Minister Raosaheb Danve
Central Railway State Minister Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद ः आपल्या ३५-४० वर्षाच्या राजकारणात निरनिराळे डावपेच आखात विरोधकांना चकवा देण्यात माहिर असलेले केंद्रीय रेल्वे कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पाककलेत देखील तरबेज आहेत. दिवाळी निमित्त सध्या आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी असलेल्या दानवे यांच्या या पाककलेचे दर्शन त्यांच्या चाहत्यांना घडले.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दानवे यांनी बालपणाची दिवाळी ते स्वयंपाक घरात आपल्याला काय काय बनवता येते हे नुसते सांगितले नाही तर ते करूनही दाखवले. नवीन लग्न झाल्यावर मीच चहा बनवून बायकोला द्यायचो यासह सुरसी पेटवून ती झाडावर फेकल्यामुळे एकदा आलेली आफत याचे रंजक किस्से देखील दानवे यांनी सांगितले.

गावचे सरपंच ते केंद्रात मंत्री असा दानवे यांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असाच म्हणावा लागेल. हाऊ मच या दोन इंग्रजी अक्षरांवर जागातील बारा देश फिरून येणे असो, की मग जाहीर सभांमधून आपल्या ग्रामीण शैलीतून त्यांनी विरोधाकांना दिलेल्या बिनकामाच्या बैलाच्या उपमा असो, दानवे सातत्याने चर्चेत असतात.

शेतात चुलीवर भाजी करतांना, चहा बनवतांना दानवे यांचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहेत. शेतात गाय-म्हशीचे दूध काढणे, औत हाकणे, ट्रॅक्टरने नांगरणी, बुलेट, घोड्याची सवारी असो की मग हातावर भाकरी घेऊन ठेचा खाणे या त्यांच्या हटके पण साधेपणाची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते.

दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी लहाणपणाच्या आठवणींना उजाळा दिला. लहान असतांना आपण शेतात सुरसुरी पेटवून तिची तार वाकडी करून झाडावर फेकायचो, पण एकदा हीच सुरसुरी झाडावर न पडता ऊसाने बनवलेल्या सपरावर पडली आणि मोठा अनर्थ घडला. सुदैवाने सपरातील जनावरे वाचली, पण लोक जेव्हा सुरसुरी कुणी फेकली याचा शोध घेत होते, तेव्हा आपली अवस्था काय होती याचा रंजक किस्सा सांगितला.

घरच्यांना हा प्रताप आपलाच असल्याचे कळाल्यावर माझे काय झाले असेल याची कल्पना करा, असेही दानवे मिश्किलपणे म्हणाले. आपल्याला चहा बनवता येतो हे सांगतांनाच आपण तव्यावरची भाकरी देखील महिला करणार नाहीत, त्यापेक्षा चांगली बनवतो असा दावा दानवे यांनी केला.

Central Railway State Minister Raosaheb Danve
शिवसेनेच्या महिलांनी साजरी केली स्मशान जोग्यांसोबत भाऊबीज

एवढ्यावरच न थांबता त्यांनी किचनमध्ये पत्नी निर्मला दानवे यांच्यासोबत प्रवेश करत भाकरीच पीठ मळत तव्यावर अगदी गोल आकाराची खरपूस भाकरी देखील करून दाखवली. दानवे यांच्या या पाककलेची राजकीय वर्तुळात आता चंगलीच चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in