टोपे साहेब, "कामं उरकून घ्या, आम्ही केवळ दोन-तीन दिवसच विरोधी पक्षात आहोत..."

भविष्यात तुम्हाला काम करायची असतील तर त्याचाही विचार आम्ही करू, असे म्हणत त्यांनी टोपे यांना भाजप प्रवेशाची आॅफर देखील देवून टाकली. (Bjp)
Minister Raosaheb Danve-Rajesh Tope
Minister Raosaheb Danve-Rajesh TopeSarkarnama

जालना : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी आमचा काडीचा संबंध नाही, आम्ही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही, असा सूर आळवणारे भाजपचे नेते आता मात्र दोन-तीन दिवसांत सरकार पडणार असल्याची भविष्यावाणी करू लागले आहे. जालना येथील एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) एकत्र आले असतांना दानवे यांनी सूचक विधान केले.

टोपे यांना उद्देशून दानवे म्हणाले, तुम्ही बारा-तेरा वर्षापासून जिल्ह्यात काम करत आहात, अजून काही काम शिल्लक असतील तर दोन-तीन दिवसांत उरकून घ्या. मी सध्या केंद्रात राज्यमंत्री आहे, पण राज्यातही आता दोन-तीन दिवसांत आम्ही विरोधी पक्षात राहणार नाही. तेव्हा काम उरलेली काम करायला तुम्हाला जास्त वेळ नाही, असा चिमटा काढत राज्यातील सत्तांतराचे संकेत त्यांनी दिले.

भविष्यात तुम्हाला काम करायची असतील तर त्याचाही विचार आम्ही करू, असे म्हणत त्यांनी टोपे यांना भाजप प्रवेशाची आॅफर देखील देवून टाकली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्ष अशा ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून ते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत मुक्कामाला आहेत. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून हे सरकार टिकवण्यासाठी १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी जालना येथील एका कार्यक्रमात एकत्र आलेल्या दानवेंनी टोपे यांना सूचक इशाला दिला.

Minister Raosaheb Danve-Rajesh Tope
आमच्यासाठी मातोश्रीचा आदेशच अंतिम ; शिवसैनिकाची रक्ताने पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना ग्वाही..

दानवे म्हणाले, मी केंद्रात राज्यमंत्री आहे, गेल्या अडीच तीन वर्षापासून जिल्ह्यात अनेक विकासकामे करत आहे. तर राजेश भैय्या टोपे हे बारा-तेरा वर्षापासून जिल्ह्यात काम करतात. काही काम शिल्लक असतील तर ती लवकर उरकून घ्या, कारण दोन-तीन दिवसांत मी विरोधी पक्षात नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला जी कामे करून घ्यायची आहे ती करून घ्या, वेळ कमी आहे. पण भविष्यात तुम्हाला काम करण्याची संधी पाहिजे असेल तर त्याचाही विचार करायला आम्ही तयार आहोत, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com