Raosaheb Danve : राजकीय वातावरण तापलेलं असतानाच रावसाहेब दानवेंचं मध्यावधी निवडणुकांबाबत मोठं विधान; म्हणाले...

Raosaheb Danve : राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता...
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

Raosaheb Danve News: महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार राज्यातील शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचं भाकितं वर्तवलं जात असते. तसेच मध्यावधी निवडणुकांची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचवेळी आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रावसाहेब दानवे हे औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. दानवे म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा खळबळजनक दावा दानवेंनी केला आहे.

Raosaheb Danve
अमित शहांचे जाहीर आभार मानताना सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर साधला निशाणा

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या देखील निवडणुका होऊ शकतात. याचदरम्यान, राजकीय घडामोडी होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे.

Raosaheb Danve
Manikrao Kakate : अधिवेशन सोडून माणिकराव कोकाटे नाशिकला परतले, कारण...

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना विऱोधकांकडून शिंदे गटातील मंत्र्यांचे नवनवीन घोटाळे बाहेर काढले जात आहे. यात स्वत: मुख्यमंत्री, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत अशा मंत्र्यांना घोटाळ्यावरुन घेरण्याचा प्रयत्न सुरु असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरु लागली आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच दानवेंच्या दाव्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com