Raosaheb Danve : मुलायम सिंग यांच्या पक्षासारखेच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह जाईल...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी याच काँग्रेस-राष्टवादीमुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप दानवे यांनी केला. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Uddhav Thackeray
Raosaheb Danve-Uddhav ThackeraySarkarnama

जालना : खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे, ज्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत आमदार आणि खासदारही आहेत असे दिसते. त्यामुळे न्यायालयात देखील हेच सिद्ध होईल की शिंदे गट हीच खरी शिवसेना (Uddhav Thackeray) आहे. उत्तर प्रदेशात ज्या प्रमाणे समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यांच्या पक्षाचे चिन्ह गेले होते, तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह जाईल, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.

जालना येथे प्रसार माध्यमाशी बोलतांना दानवे यांनी शिवसेनेचे १२ खासदार संपर्कात असल्याचेही सांगितले. (Marathwada) रावसाहेब दानवे म्हणाले, शिवसेनेचे १८पैकी १२ खासदार हे आमच्या संपर्कात असून ते शिवसेनेच्या शिंदे गटासोबत म्हणजेच मुळ शिवसेनेत येऊ इच्छितात.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप मित्र पक्षांच्या मदतीने स्वबळावर लढवेल, तसेच शिंदे गटाशी देखील चर्चा केली जाईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू, असेही ते म्हणाले.

Raosaheb Danve-Uddhav Thackeray
शरद पवार आणि रावसाहेब दानवे दिल्लीत एक कार्यक्रम ठरविणार....

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी याच काँग्रेस आणि राष्टवादीमुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप दानवे यांनी केला. परंतु भाजप या निवडणुकीत ओबीसींना पूर्ण न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in