Raosaheb Danve : राजकारणात विश्वास अन् संयम असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही

श्रीमंती, बडेजाव लोकांना आवडत नाही, त्यामुळे आपल्या आवडीनिवडीला मुरड घालून लोकांना जे आवडतं तसं आपल वागणं असलं पाहिजे. (Raosaheb Danve)
Central Minister Raosaheb Danve
Central Minister Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद : राजकारण हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्हाला खूप संयम बाळगावा लागतो, स्वतःवर खूप मर्यादा घालाव्या लगतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करावा लागतो. (Bjp) हे ज्याला जमले तो राजकारणात कधी अयशस्वी होऊ शकत नाही. राजकारणाचा गंध नसलेल्या कुटुंबात मी जन्माला आलो, अडीचशे लोकसंख्या असलेल्या गावातील माझ्या सारखा सामान्य माणून विश्वास आणि संयमाच्या जोरावर २५ निवडणुका लढतो आणि त्यातल्या २४ जिंकतो हे संयम आणि कमावलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले, असा मोलाचा संदेश केंद्रीय रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी तरुणाईला दिला.

सकाळच्या यिन समर युथ समिट कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी उपस्थित तरुणांना राजकाराणात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिली. (Aurangabad) गावचा सरपंच ते केंद्रात मंत्री या आपल्या राजकीय प्रवासाबद्दलच्या अनेक गोष्टी दानवे यांनी यावेळी उलगडून सांगितल्या. राजकारणात इंग्रजी आलेच पाहिजे असे नाही, असे सांगत त्यांनी सातत्याने आपल्याशी इंग्रजी बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कसा धडा शिकवला याचा रंजक किस्सा देखील यावेळी सांगितला. (Marathwada)

रावसाहेब दानवे म्हणाले, राजकारण, क्रिकेट आणि बाॅलीवडून या ती क्षेत्राविषयी प्रत्येकाला आकर्षण असते. कारण या क्षेत्रात लवकर यश आणि प्रसिद्धी मिळते. पण बाॅलीवूडमध्ये काम करतांना एखादा शाॅट चुकला तर रिटेक करता येते, क्रिकेटमध्ये सामन्याआधी तुम्हाला सराव करता येतो. पण राजकारणात रिटेक नसतो, तिथे बाॅल आला की ठोकावाच लागतो.

१९ व्या वर्षी मी गावचा सरपंच आणि पंचायत समितीचा सभापती झालो. माझे चांगले काम पाहून मला लोकांनी आमदार, खासदार आणि केंद्रात दोनवेळा मंत्री केले. या सगळ्या राजकीय प्रवासात मिळालेले यश हे केवळ मी लोकांचा विश्वास संपादन केल्याममुळे मिळाले. आपण आमदार, खासदार, मंत्री झाल्याचा ताण आपल्यावर प्रेम करणाऱ्या मतदार, कार्यकर्त्यांना येता कामा नये हे पथ्य मी आयुष्यभर पाळत आलो आहे.

श्रीमंती, बडेजाव लोकांना आवडत नाही, त्यामुळे आपल्या आवडीनिवडीला मुरड घालून लोकांना जे आवडतं तसं आपल वागणं असलं पाहिजे. आमदार झाल्यावर जेव्हा मी गावात जायचो तेव्हा लोक मला चहा करायचे. चुलीवर चहा टाकला की बकरी शोधायला जायचे आणि दुध मिळाले की मग मला चहा मिळायचा. यात खूप वेळ व्हायचा आणि मला दुसऱ्या गावात जाता येत नव्हते. ही अडचण ओळखून मी प्रत्येकाकडे गेल्यावर त्याला मला डाॅक्टरेन बिन दुथाचा चहा प्यायाला सांगितल्याचे सांगायचो आणि तसाच चहा प्यायचो. त्यामुळे लोकांची अडचण दूर झाली आणि माझा वेळही वाचला, असा किस्सा देखील दावने यांनी यावेळी सांगितला.

पहिल्यांदा आपण जेव्हा विधानसभेची निवडणूक लढलो तेव्हा ती फक्त ६० हजारात लढलो होतो. आता निवडणुका खूप खर्चिक झाल्या आहेत, असे सांगतांनाच राजकारणा कधीही पुढे पुढे करायचे नसते, जो जास्त पुढे जातो तो तितक्याच वेगाने मागे येतो, असेही दानवे यांनी सांगितले. तुम्हाला केंद्रात मंत्री व्हायला आवडेल की राज्याचा मुख्यमंत्री या प्रश्नाला देखील दानवे यांनी व्यवस्थीतरित्या टोलवले.

Central Minister Raosaheb Danve
राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' मागण्या

मी केंद्रात मंत्री असतांना अमित शहा यांनी माझ्या भोकरदन मतदारसंघात मुक्कामी असतांना तुम्ही दिल्लीत काय करता तुम्हाला राज्याची जबाबदारी देतो असे म्हटले होते. दिल्लीत गेल्यानंतर मी पंतप्रधान मोंदीना नमस्कार केला, त्यांचे लक्ष नव्हते. मग मी पुन्हा दुसऱ्या दरवाजाने त्यांच्या समोर जाऊन नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, बाद मे मुझे आके मिलना. मला भिती वाटली मंत्रीपद जाते की काय? असा मनात विचार आला.

अमित भाईंना भिती बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला सांगितले आमचे बोलणे झाले आहे, तुम्ही मोदीजींना जाऊन भेटा. नंतर मला राज्यात पाठवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. मिळेत त्यात समाधान मानायचे कधीही कुठली अपेक्षा ठेवायची नाही आणि ती व्यक्त करायची नाही. तुमच्या कामाकडे पक्षाचे लक्ष असते, त्यामुळे योग्यवेळी तुम्हाला जे द्यायचे ते पक्ष देत असतो. आपण फक्त आपले काम करायचे, असा मोलाचा सल्ला देखील दानवे यांनी यावेळी तरुणांना दिला.

इंग्रजीमुळे राजकारणात काहीच अडत नाही, माझ्या रेल्वे खात्यात अनेक दक्षिणेतील अधिकारी आहेत. ते नेहमी इंग्रतीत बोलायचे, त्यांना मी हिंदीत बोला असे वारंवार सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. एक दिवस मीच त्यांच्याशी मराठी बोलायला सुरूवात केली. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला मराठी येत नाही. मग मी त्यांना म्हणालो, मला इंग्रजी येत नाही, तुम्हाला मराठी येत नाही, तर मग हिंदीचा पर्याय आहे, तो वापरा. तेव्हापासून ते माझ्याशी हिंदीत बोलतात, असा किस्सा सांगताच दानवे यांना उपस्थितींनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com