Raosaheb Danve: फडणवीस `शतरंज के बादशाह`, आता आम्ही नवी चाल खेळू..

एकनाथ खडसेच नाही तर महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. (Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve- Devendra Fadanvis
Minister Raosaheb Danve- Devendra FadanvisSarkarnama

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही पक्षांना धूळ चारली. आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शतरंज के बादशाह आहेत हे त्यांनी सिद्ध केले. विधान परिषद निवडणुकीत देखील आम्ही भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणू. राज्यसभा निवडणुकीत केलेली खेळी महाविकास आघाडीच्या आता लक्षात आली आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी आम्ही नवी चाल खेळू, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडील धक्का दिल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. (Aurangabad) भाजपने पाचवा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीत पुन्हा रंगत आली आहे. महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून नव्याने तयारी करत आहे.

तर दुसरीकडे भाजपने देखील आपले पत्ते टाकायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे शतरंज के बादशाह आहेत, हे त्यांनी राज्यसभा निवडणुकीत सिद्ध केले आहे. विधान परिषद निवडणुकीत देखील त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप आपले सगळे उमेदवार निवडून आणेल.

परंतु आता आम्ही वेगळी चाल खेळणार आहोत. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने एकनाथ खडसेंना उमेदवारी देऊ नका, ही अट टाकली होती का? या प्रश्नावर कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच नाही तर महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Minister Raosaheb Danve- Devendra Fadanvis
Shivsena : रावसाहेब वीस वर्षापासून खासदार, लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते, मग त्यांनी काय केले ?

पंकजा मुंडे यांना इम्तियाज जलील यांनी नवा पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे, यावर पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय सचिव आहे, असं कुणाच्या सांगण्यावर त्या निर्णय घेणार नाहीत. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे, योग्यवेळी पक्षात त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल, असे सांगत त्यांनी पंकजा नवा पक्ष काढणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com