कोथळे काढण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना रावसाहेब दानवेंचे खुले आव्हान

Raosaheb Danve| Sanjay Raut| महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना मते दिली, पण शिवसेनेने धोका दिला.
कोथळे काढण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना रावसाहेब दानवेंचे खुले आव्हान
Raosaheb Danve

Raosaheb Danve latest political news

जालना : शिवसेनेचं आमच्यासोबत लग्न ठरलं आणि पळून जाऊ दुसऱ्याशी लग्न केले. असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. एका मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) पदासाठी यांचे सर्व आमदार खासदार नाराज आहेत. हे काय आमचे कोथळे काढतात, येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे बाहेर काढू, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले आहे.

विरोधक आपल्याला बदनाम करत आहेत, पण पण नैतिकता सांभाळत बसलो. तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे, असा इशारा शिवसेना खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (Bjp) दिला. या इशाऱ्याला रावसाहेब दानवेंनी खुले आव्हान दिले आहे.

Raosaheb Danve
हिंदुत्वाचा हुंकार! शिवसेना डरकाळी फोडणार; उद्धव ठाकरेंच्या सभेचा वादळी टीझर रिलीज

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना मते दिली, पण शिवसेनेने धोका दिला, असंगाशी संग केला. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली. पण आज राज्यातील वाईट दिवस पाहण्याची वेळ आली आहे. जो मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याना मदत करत नाही, जो मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकवू शकला नाही त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असतील पण जनतेसाठी नाही, असेही दानवेंनी यावेळी नमुद केलं.

यावेळी रावसाहेब दानवेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. "छगन भुजबळ यांनी बिनबुडाचे आरोप केले. ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डेटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने करुनही दोन वर्षांत या सरकारला तो डेटा देता आला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निकाल दिल्यानंतर हे सरकार सात महिन्याची मुदत मागत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. असा टोलाही दानवेंनी यावेळी लगवला.

राज ठाकरेंना आम्ही पुढे आणले नाही, जेव्हा ते तुमच्या फेवरमध्ये बोलत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता तुमचे कर्तृत्व पाहून ते तुमच्या विरोधात बोलत आहेत. मुख्यमंत्रीपद कोणत्याही जातीसाठी नसते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते पण आमच मते चोरली गेली. परंतु आता चोर पकडला गेला आहे, आणि येत्या काळात त्यांना शिक्षा मिळणार असल्याचा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.