बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे, तुम्ही त्यांच्या पोटी आलात म्हणजे राजा झालात का ?

गद्दारी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी केली नाही, तर उद्धव ठाकरे यांनीच भाजपशी तेव्हा गद्दारी केली होती. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Uddhav Thackeray News
Raosaheb Danve-Uddhav Thackeray NewsSarkarnama

दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडलेल्या आमदारांना माझ्या वडिलांचे फोटो लावून मत मागू नका, तर तुमच्या वडिलांचे फोटो लावून मागा, असे आव्हान दिले आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे हे जरी उद्धव (Uddhav Thackeray) यांचे वडिल असले तरी ते सगळ्या महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्राचा राजा माणूस म्हणून त्यांना देश ओळखतो. राजाच्या पोटी आलो म्हणजे आपण राजा झालोत असे समजण्याचे कारण नाही. कारण राजा पोटी आल्याने नाही तर मतपेटीतून ठरत असतो, अशा शब्दात दानवे यांनी ठाकरेंवर टीका केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर निशाणा साधतांना त्यांना माझ्या वडिलांचे नाव आणि फोटो वापरून मतं मागू नका, तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असे आव्हान दिले होते. (Shivsena) त्यानंतर बंडखोर आमदारांकडून देखील ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहेत. आता या वादात भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील उडी घेतली आहे.

दिल्लीत शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर व रावसाहेब दानवे यांची गुप्त भेट आणि त्यांनी एकत्रित घेतलेल्या ब्रेकफास्टची चर्चा राज्यभरात सुरू आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले, माझ्यात आणि खोतकर यांच्यात काही मतभेद होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ते मिटले आहेत. आम्ही एकमेकांना साखर भरवली, आज सोबत नाश्ताही केला.

प्रसार माध्यमांमध्ये काहीही बातम्या येत असल्या तरी आमचे आता मनोमिलन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हटले आहे, शिवाय आपल्या आजारपणात हा कट शिजल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आजारपणाचा आणि याचा काहीही संबंध नाही, गद्दारी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी केली नाही, तर उद्धव ठाकरे यांनीच भाजपशी तेव्हा गद्दारी केली होती.

Raosaheb Danve-Uddhav Thackeray News
Sanjay Raut : खोतकर दोन दिवसांपुर्वी मला म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही..

राज्यातील मतदारांनी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना मिळून मतं व बहुमत दिले होते, याचा पुनरुच्चार देखील दानवेंनी केला. राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदे यांना जी अपमानस्पद वागणुक ठाकरेंनी दिली, त्यातूनच हे घडले, असा दावा देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com