
औरंगाबाद : मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोप याकूब मेमन यांच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि भाजपने पुन्हा एकदा (Shivsena) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. विचारांना तिलांजली देऊन वेगळ्या विचाराने वागलात म्हणूनच दहशतवादी लोकांच्या कबरी सरकारी मदतीने सजवल्या गेल्या असतील. हा प्रकार गंभीर आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आल्याच्या विषयावर (Roasaheb Danve) दानवे यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दानवे म्हणाले, आधी औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीला पोलिस संरक्षण दिले आणि दहशतावद्याच्या कबरीचे सुशोभीकरण केले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात अशा अनेक घटना घडल्या.
विशेषतः शिवसेनेने राष्ट्रवादी व काॅंग्रेसची साथ धरली तेव्हा पासून राज्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आणि सत्तेमुळे शिवसेनेला त्याचे समर्थन करावे लागले. याकुब मेमन सारख्या दहशतवाद्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले. या गुन्ह्यात त्याला फाशीची शिक्षा झाली.
भारत सरकराने त्याच्या पाकिस्तानमधील नातेवाईकांकडे मृतदेह पाठवण्याची तयारी दर्शवली पण नातेवाईकांनी देखील त्याला वाऱ्यावर सोडले. अशा बेवारस माणसाची कबर सजवण्याचे पाप मागच्या सरकारच्या काळात घडले. याला तत्कालीन सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. त्यांनी संपर्ण राज्याची माफी मागितली पाहिजे, याचा पुनरुच्चार देखील रावसाहेब दानवे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.