रेल्वे मंत्रालयातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना दानवेंचा हिसका ; थेट बडतर्फच केले

दानवे यांनी कारवाईचा बडगा उगारत रेल्वे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील आपला मराठवाडी हिसका दाखवल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. (Raosaheb Danve)
Railway State Minister Raosaheb Dnave
Railway State Minister Raosaheb DnaveSarkarnama

दिल्ली : केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्याच मंत्रालयातील कामचुकार आणि तिकीटांच्या आरक्षणात अनियमितता करणाऱ्या तब्बल २५-२६ अधिकारी कर्मचाऱ्यांची थेट कार्यमुक्त करत हिसका दाखवला आहे. दानवेंच्या (Raosaheb Danve) या कारवाईने रेल्वे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.

रावसाहेब दानवे यांनी रेल्वे खात्याचा राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. (Dehli) विशेषतः मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यााचे काम त्यांनी केले. मराठवाड्यातील रेल्वे रुंदीकरण, विद्युतीकरण व नव्या मार्गांचे सर्वेक्षण करून त्या कामांना सुरूवात करण्याच्या दृष्टीने देखील पावले उचलली आहेत. (Marathwada)

मराठवाड्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पीट लाईनचा प्रश्न देखील दानवे यांनीच मार्गी लावला. त्यामुळे आता मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद या दोन शहरात रेल्वे पीट लाईन होत आहे. एकीकडे असे काम सुरू असतांना दुसरीकडे रेल्वे मंत्रालयातील काही कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रेल्वे आरक्षणामध्ये गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले.

Railway State Minister Raosaheb Dnave
Beed : अवैध वाळू उपशात प्रशासनासह, पुढाऱ्यांचा सहभाग ; भाजप आमदाराचा रोख कोणाकडे ?

यावर दानवे यांनी कठोर भूमिका घेत रेल्वे ममंत्रालयातील एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल २५ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये सहायक अधिकारी, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

राज्यमंत्री झाल्यावर आपल्या चांगल्या कामाची छाप पाडणाऱ्या दानवे यांनी कारवाईचा बडगा उगारत रेल्वे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील आपला मराठवाडी हिसका दाखवल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com