Raosaheb Danave : दानवेंनी दिली नेत्यांना फटाक्यांची नावे : फडणवीस बॉम्ब तर ठाकरे फुसका फटाका..

Raosaheb Danave : प्रत्येकाच्या खिशात लवंगी फटाके आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये लवंगी फटाकेच राहिलेत.
Central State Railway Minister Raosaheb Danve News
Central State Railway Minister Raosaheb Danve NewsSarkarnama

जालना : केंद्रिय कोळसा कदान व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गावच्या निवासस्थानी दिवाळी सण साजरा केला. आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांना ओवाळण्यात आले. दानवे यांच्या बहिणीच्या घरी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांना आपल्या बालपणीच्या दिवाळी सणाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना देशातील विविध राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा दिली.

यावेळी राजकारणातल्या नेत्यांना त्यांनी विविध फटाक्यांची नावे दिली. राजकारणातला रॉकेट कोण? या प्रश्नाला क्षणभरात त्यांनी उत्तर दिले. राजकारणातला रॉकेट म्हणजे नरेंद्र मोदी, असे म्हंटले. अॅटमबॉम्ब कोण या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस असे उत्तर दानवेंनी दिले.

Central State Railway Minister Raosaheb Danve News
Marathwada : एसी गाडीत फिरून ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा..

लवंगी फटाका कोण? या प्रश्नाला त्यांनी भन्नाट उत्तर दिले. दानेवे म्हणाले, आता नुसते लवंगी फटाके राहिलेत. अॅटमबॉम्ब राहिलेच नाही. प्रत्येकाच्या खिशात लवंगी फटाके आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये लवंगी फटाकेच राहिलेत. अॅटमबॉम्ब कोणाजवळच नाही राहिला. रॉकेट आणि अॅटमबॉम्ब फक्त आमच्याकडे म्हणजे भाजपकडे आहे.

Central State Railway Minister Raosaheb Danve News
पहिला आसूड उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे : रावसाहेब दानवेंचे उत्तर

लड कोण आहे? या प्रश्नावरही दानवेंनी हटके उत्तर दिले. लड तर आता मनसेला म्हणता येईल. एकदा ते फुटायला लागले की, थांबातच नाहीत. त्यांच्याशिवाय लड कोणाकडेही नाही. सगळे सिंगल सिंगल झालेत आता. खाकी फटाका आवाज देणारा नेता म्हणजे शरद पवार, तर फुसका फटाका कोण? यावर ते म्हणाले की, शिवसेना आणि त्यांचे शिवसेनेचे नेते म्हणजे फुसका फटाका, असा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in