Chandrakant Khaire On Rane : राणेंची पोरं रिकामटेकडी, त्यांना अक्कल आहे का?

Shivsena : गजानन किर्तीकर यांनी भाजपमध्ये मिंधे गटाची काय अवस्था आहे याबद्दल स्पष्टच सांगितले आहे.
Chandrakant Khaire On Rane News
Chandrakant Khaire On Rane NewsSarkarnama

Marathwada : उठसूठ संजय राऊत, उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करणारी नारायण राणे यांची दोन्ही मुलं रिकामटेकडी आहेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. (Chandrakant Khaire On Rane News) या दोन्ही मुलांना काही अक्कल नाही, अशी टीकाही खैरे यांनी केली. ठाकरे-शिंदे गटाच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे उडी घेत असतात.

Chandrakant Khaire On Rane News
Sanjay Shirsat on Sanjay Raut News : राऊतांनी जे तिकडे आहेत त्यांची काळजी करावी, त्यांना सांभाळावे..

संजय राऊत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मातोश्रीवर खोटेनाटे आरोप, टीका ही देखील नित्याची बाब बनली आहे. यावरून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राणे यांचे पुत्र नितेश व निलेश राणे यांचा उल्लेख रिकामटेकडे असा केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, राणे यांना या रिकामटेकड्या मुलांचा पश्चाताप होत असेल. (Nitesh Rane) नितेश राणे याला अक्कल आहे का? काहीही बोलतो, अशी रिकामटेकडी मुलं असणं हे राणेंचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

गजानन किर्तीकर यांनी भाजपमध्ये मिंधे गटाची काय अवस्था आहे याबद्दल स्पष्टच सांगितले आहे. मुळात किर्तीकर तिकडे का गेले? मी त्यांना जावू नका म्हणालो होतो. पण आता त्यांना भाजपमध्ये कशी वागणूक मिळते हे कळायलां लागलं आहे. मुलाविरुद्धच लढण्याची वेळ त्यांच्यावर येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार होते, त्यातले १३ फुटून बाहेर पडले, त्यामुळे भाजप मिंधे गटाला पुर्वी इतक्या लोकसभेच्या जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

शिवाय जे खासदार बंडखोरी करून शिंदेसोंबत गेले आहेत, त्यापैकी एकही निवडून येणार नाही, असा भाजपचा सर्वे सांगतो आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटात आपापसात भांडण सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर हा कायम शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या निवडणुकीत मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता. पण लोक आता त्यांना कंटाळले आहेत, आमची चूक झाली अस ते म्हणू लागले आहेत, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com