राणा पाटलांचे विश्वासू दत्ता बंडगर शिवसेनेत ; भाजपला दणका

(This decision has been taken as the umbilical cord does not conform to the principles of BJP.) आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला)
Eknath Shinde-Datta Bander
Eknath Shinde-Datta BanderSarkarnama

उस्मानाबाद ः माजी नगराध्यक्ष भाजपचे दत्ता बंडगर यानी बुधवारी (ता.24) शिवसेनेत प्रवेश केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून घेतले. राष्ट्रवादी व्हाया भाजप आणि आता शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने याचा फायदा आगामी काळात पक्षाला होऊ शकतो. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची या प्रवेश सोहळ्याला उपस्थिती होती.

उस्मानाबाद शहरात डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या सत्ताकाळात जे विश्वासु लोक होते, त्यातील एक नाव म्हणजे दत्ता बंडगर. त्याना डॉ.पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची संधी देखील दिली होती. शिवाय अनेक वर्ष ते नगरसेवक म्हणुन काम करत होते. राणाजगजितसिंह पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतरही बंडगर मुख्य फळीत काम करत होते.

मधल्या काळात मात्र पाटील गटापासुन दत्ता बंडगर काहीसे दुर गेल्याचे चित्र होते. राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अनेक जणांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले होते, बंडगर यांनी मात्र आतापर्यंत संयम ठेवला होता.

परंतु घुसमट होत असल्याने त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे राणा पाटील यांना हा धक्का समजला जातो. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने विश्वासु लोक नेत्यापासुन बाजुला जात असल्याने वेगवेगळ्या चर्चा देखील जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. भाजपच्या तत्वाशी नाळ जुळत नसल्याने हा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde-Datta Bander
दुर्राणींचे पंख छाटून, विटेकरांना बळ देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

आपण सगळ्या जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या वैचारीकतेचे असुन कट्टरतावादी पक्षाबरोबर काम करणे आपल्याला शक्य नसल्याचे दत्ता बंडगर यानी सांगितले. आतापर्यंत ज्या निष्ठेने आपण काम केले होते, त्याचप्रकारे शिवसेनेमध्ये काम करणार असल्याचा विश्वास बंडगर यांनी शिवसेनेतील नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com