Dharashiv Market Committee News
Dharashiv Market Committee NewsSarkarnama

Osmanabad District APMC Election : राणा पाटलांनी तुळजापूर, धाराशीवमध्ये सत्ता राखली ; जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी..

Mahavikas Aghadi : शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही पहिलीच तालुका पातळीवरील निवडणुक होती.

Marathwada : जिल्ह्यामध्ये निवडणुक झालेल्या आठ बाजार समितीपैकी (Osmanabad District APMC Election) पाच ठिकाणी महाविकास आघाडीने सत्तास्थापन करीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) ला धक्का दिल्याचे चित्र आहे.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे असलेल्या धाराशिवची सत्ता राखण्यात त्याना यश आले आहे. शिवाय ते प्रतिनिधित्व करत असलेल्या तुळजापुरची बाजार समिती देखील त्यांनी खेचुन आणली आहे.

Dharashiv Market Committee News
Vaijapur APMC Election : भाजपमध्ये फूट पडूनही आमदार बोरनारेंनी बाजी मारली, दहा जांगा जिंकल्या..

मात्र त्याचवेळी कळंबमध्ये त्यांच्याकडील बाजार समिती आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आणत सत्तांतर केले आहे. जिल्ह्यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीने लक्षवेधी ठरलेल्या बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. भुम, तुळजापुर व धाराशिव या ठिकाणी राज्यात सत्ताधारी असलेल्य़ा भाजप -शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र पाच ठिकाणी महाविकास आघाडीने चमत्कार घडवुन सत्ता आणली आहे.

उमरगा व मुरुम या ठिकाणी माजी आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे. (Ranajagjeetsingh Patil) तिथे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले व माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. परंडा व वाशी याठिकाणी राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील या दोन माजी आमदारांनी चांगली लढत देत पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांना रोखले आहे.

तर सावंत यांनी भुमच्या बाजार समितीवर यश मिळवत मतदारसंघातील आपली ताकद दाखवून दिली. कळंबच्या बाजार समितीचा विचार केला तर आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील बाजार समिती राणा पाटील यांच्याकडून खेचुन आणली आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही पहिलीच तालुका पातळीवरील निवडणुक होती. त्यामुळे जिल्ह्यात नेमकी कोणाची शक्ती आहे याचा अंदाज या निवडणुकीमुळे आला आहे.

भाजप व शिंदे सेनेला अजुनही जिल्ह्यात पाय पसरता आलेले नसल्याचे या निकालावरुन दिसुन आले आहे. प्रा. सावंत यांना त्यांच्या मतदारसंघातील तीनपैकी दोन ठिकाणी अपयश आल्याने त्यांना देखील हा धक्का असल्याचे बोलले जाते. याशिवाय आमदार चौगुले यांनाही मतदारसंघातील एकही बाजार समिती जिंकता आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतुन फुटुन गेलेल्या आमदारांना भविष्यात हा धोका ओळखून वाटचाल करावी लागणार आहे. राणा पाटील यांने आपले वर्चस्व टिकवून ठेवत यश मिळवले आहे. ठाकरे गटाचे निष्टावंत आमदार कैलास पाटील यांनाही कळंबमध्ये यश मिळाल्याने त्यांचाही प्रभाव दिसून आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com