Raju Shetti : कोळसा अभावी एकही उद्योग बंद नाही, मग वीजटंचाई फक्त जनतेलाच ?

विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागत नाहीत. तसेच सत्ताधारी ही तसे वागत नाहीत. विरोधकांना आपण दिल्लीत सत्तेवर असल्याने त्यांच्या चुका समोर येतील असे वाटते. (Raju Sheety)
Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Sheety News Updates
Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Sheety News UpdatesSarkarnama

तुळजापूर : भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेचे पहा असा, टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला. (Raju Shetii) बळीराजा हुंकार यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे. तत्पुर्वी शेट्टी यांनी तुळजापूर येथे येऊन शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष्य वेधले. (Osmanabad) पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील भोंग्याच्य विषयावरून टोला लगावला. (Marathwada)

शेट्टी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्रातील सरकारकडे आपला जाण्याचा प्रश्नच नाही. येत्या १ मे पासून गावसभा घेऊन राष्ट्रपतींकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी निवेदन दिले जाणार आहे. शेतकरी भारनियमनाने त्रस्त आहे. रात्रीची वीज देऊन शेतकऱ्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली केली जात आहे. मागील पाच वर्षात रात्रीच्या विजेमुळे किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाले याची माहिती देखील आम्ही गोळा करणार आहोत. (Raju Sheety News Updates)

हमीभाव कायदा करावा अशीही आमची मागणी आहे. कोणताही उद्योग कोळश्याअभावी बंद आहे असे आपण ऐकलेले नाही. अतिरिक्त उसाच्या प्रश्नाला देखील राज्य सरकार जबाबदार आहे. ऊस किती शिल्लक आहे, त्याचे क्षेत्र किती आहे. याबाबत राज्य सरकारने नियोजन करणे आवश्यक होते.

Swbhimani Shetkari Sanghtana Leader Raju Sheety News Updates
Latur : कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून जनतेला वेठीस धरण्याचा सरकारचा कट

विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागत नाहीत. तसेच सत्ताधारी ही तसे वागत नाहीत. विरोधकांना आपण दिल्लीत सत्तेवर असल्याने त्यांच्या चुका समोर येतील असे वाटते. तर महाविकास आघाडीचा कारभारही नियोजन शून्य असल्याचे शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in