Rajesh Tope : खाजगी रुग्णालयाचे ते बील माझे नाही, तर माझ्या आईचे..

आपण दररोज ५० ते ६० हजार कोरोना रुग्ण पाहिले आहेत, तिथे सध्या फक्त शंभर-दीडशे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लगेच काही बंधने घालण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याचा विचार नाही. (Rajesh Tope)
Rajesh Tope : खाजगी रुग्णालयाचे ते बील माझे नाही, तर माझ्या आईचे..
Rajesh TopeSarkarnama

औरंगाबाद : राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी कोरोना काळात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून लाखोंची बील देखील अदा करण्यात आली. (Aurangabad)माहिती अधिकारात ही बाब उघड झाल्यानंतर राज्यभरात यावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचे सर्वाधिक ३४ लाखांचे बील असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. (Marathwada) यावर टोपे यांनी खुलासा केला असून, खाजगी रुग्णालयातील उपचाराचे माझे कुठलेही वैयक्तिक बील नाही, माझी आई आजारी होती, तिचे ते बील होते, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांनी टोपे यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. टोपे म्हणाले, माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही, माझी आई आजारी होती आणि तीच ते बिल आहे. राहिला इतरांचा प्रश्न तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि त्यांचा अधिकार आहे. ही सुविधा आहे आणि त्यांनी ती सुविधा घेतली, आमचे मेडिकल इन्शुरन्स सुद्धा आहे. त्यातून हे पैसे जात असतील यातून सरकारी दवाखान्यावर विश्वास नाही, असे म्हणणे देखील चुकीचे आहे.

राज्यात कोरोना पुन्हा परतलाय का? यावर कोरोना संदर्भात केंद्र सरकारचे अलर्ट करणारे पत्र आले असल्याचे टोपे यांनी सांगितले. मात्र जिथे आपण दररोज ५० ते ६० हजार कोरोना रुग्ण पाहिले आहेत, तिथे सध्या फक्त शंभर-दीडशे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लगेच काही बंधने घालण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, तशी परिस्थिती देखील नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोपे यांच्या आरोपावर दिलेल्या उत्तराबद्दल नाराजी व्यक्त करतांना टोपे यांनी प्रसार माध्यमांनाच सुनावले. औरंगाबादेतील पक्षाच्या वैयक्तिक बैठकीत मी जे बोललो होतो, ते प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणण्याची गरज नव्हती. खूप पक्षांतर्गत आणि कौटुंबिक अशी ती गोष्ट होती.

Rajesh Tope
मंत्र्यांच्या खाजगी रुग्णालयातील उपचारावरील खर्चाच्या प्रश्नावर भारती पवारांनी हात जोडले..

सत्तार आणि भुमरे माझे मित्र आहेत,आमच्यात वैर नाही. मी महाविकास आघाडी म्हणून बोललो. आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे ही मी त्यांना सांगणार आहे, असेही टोपे म्हणाले. राज ठाकरे बाबत इतकी चर्चा करण्याची गरज नाही, गृहविभाग सभेबाबत काय निर्णय घ्यायचा तो घेईल, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.