Rajesh Tope Sing song for His Wife : राजेश टोपे जेव्हा गाणं गातात...

कार्यक्रमात अचानक टोपेंना कार्यकर्त्यानी गाणं गाण्याचा आग्रह केला.
Rajesh Tope  Sing song for His Wife
Rajesh Tope Sing song for His Wife

Rajesh Tope Sing song for His Wife : कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत संपूर्ण राज्यभरात भितीचे वातावरण होते. अशा काळात राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कार्य विशेष लक्षणीय होते. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचे आपण कोविड काळात अनेक वेळा हटके अंदाज पाहिले असेल,या कठीण काळात त्यांनी अनेक निर्णय घेत आपलं कर्तव्य बजावलं.

पण त्यांना तुम्ही कधी गाणं म्हणताना बघितलं आहे का.? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.टोपे अन गाणं.हो टोपे यांनी चक्क गाणं गायलं आहे. तेही आपल्या सौभाग्यवती मनीषा टोपे यांच्यासाठी. हे गाण गाण्याचं निमित्त होतं राजेश टोपे यांच्या वाढदिवसाचं. राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदार संघ असलेल्या घनसावंगीतील एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Rajesh Tope  Sing song for His Wife
Chandrakant Patil : '' मला अडचणीत आणताना विरोधक थकतात..''; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

कार्यक्रमात अचानक टोपेंना कार्यकर्त्यानी गाणं गाण्याचा आग्रह केला. मग टोपेंनीही आपल्या पत्नीसाठी गाणं गायलं. ''हिमालय की गोद में'' या जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे असलेल्या ''चांद सी मेहबुबा हो मेरी जबं ऐसा मैंने सोचा था" राजेश टोपे यांना गाण गाताना पाहताना मनीषा ताईदेखीव एकदम खुश झाल्या. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांसमोर चक्क पत्नीसाठी गाण गायल्याने मनीषा टोपे यांनी ही गालातल्या गालात हुसून राजेश टोपे यांच्या गाण्याला दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in