राजेश टोपेंना हरामखोर म्हणणाऱ्या लोणीकरांवर गुन्हा दाखल

राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणं माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांना चांगलच भोवलं आहे.
राजेश टोपेंना हरामखोर म्हणणाऱ्या लोणीकरांवर गुन्हा दाखल
Rajesh Tope,Babanrao Lonikarsarkarnama

जालना: आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणं माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांना चांगलच भोवलं आहे. लोणीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांचा निषेध करीत शहरातून रॅली काढली.

राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान लोणीकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

लोणीकरांच्या या वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोणीकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या फिर्यादीवरून बबनराव लोणीकर यांच्या विरोधात कलम 500 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. परतूर शहरात ही संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या विरोधात मोटार सायकल रॅली काढत जाहीर निषेध केला.

Rajesh Tope,Babanrao Lonikar
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण ; तहसीलदारांची गाडी पेटवली

लोणीकर यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या मांडत आंदोलन केले. अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पिकविम्याची मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबद्दल अपशब्द वापरले.

या वेळी महावितरण कंपनीकडून होणारी वीजबिल वसुली थांबवण्याची मागणीही लोणीकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या वेळी बोलत असताना लोणीकर यांचा तोल गेला. लोणीकर म्हणाले, टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर असे शब्द त्यांनी वापरले. यापूर्वी ही लोणीकर यांची महिला अधिकाऱ्यांबद्दलची वक्तव्ये चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला हिरोईन, तर एका महिला तहसिलदारास हेमामालिनी असे म्हटले होते. त्यानंतर आता राजेश टोपे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in