महाविकास आघाडी सरकार पडणार का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले...

भाजपसोबत युतीचे नंतर पाहू आता मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले
Raj Thackeray

Raj Thackeray

Sarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडणार असल्याचे भाकीत भाजप नेते नियमीत करत असतात. त्यातच आघाडीचे नेते सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगतात. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यादाच भाष्य केले. ते तिघांचे सरकार पाहता हे पडेल असे वाटत नाही, असे ठाकरे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Raj Thackeray</p></div>
मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र अंबानी अन् त्यांच्याच मित्राने घराखाली स्फोटके ठेवली!

राज ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक विषयांवर आपले प्रखड मत व्यक्त केले. मूळ विषय बाजूला ठेऊन, नको ते विषय पुढे येतात असे ठाकरे म्हणाले. आर्यन खान 28 दिवस दाखवला. बाहेर पडल्यावर काहीच नाही, असही ते म्हणाले. मला कुणाचे व्यक्तिगत घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या त्यांचे काम करतात. आमच्या काळात जे काम झाले ते कधीही कुठेच झाले नाही, पाण्याचा जो प्रश्न आम्ही सोडवला तो या आधी कुणीच सोडवला नाही, असेही ठाकरे म्हणाले.

या वेळी ठाकरे यांना आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार का असा प्रश्वा विचारला असता ते म्हणाले, युतीचे नंतरपाहू आता मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. युती कुणासोबत करायची हे निवडणुकीच्या वेळी ठरू, असे सांगत त्यांनी भाजप मनसे युतीच्या प्रश्नावर बोलणे टाळले.

<div class="paragraphs"><p>Raj Thackeray</p></div>
अकोला, नागपूरमध्ये आघाडीचा धुव्वा... राष्ट्रवादी काॅंग्रेस म्हणते हा तर घोडेबाजार!

एमआयएमच्या (MIM) आरक्षण मोर्चाबद्दल राज ठाकरे म्हणाले, आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठी असते, आता जर सगळेच खाजगी होत आहे तर मग, आरक्षणाचे मोर्चे फक्त मतासाठी सुरू आहे, असे सांगत त्यांनी अपत्यक्षपणे केंद्र सरकाच्या धोरणांवर टीका केली. ओबीसी आरक्षणावर बोलताना ठाकरे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार ओबीसी यादी वर बोलतात मात्र, केंद्र ओबीसींचा डाटा देत नाही. बाबरी ज्या वेळी पडली त्याचा राग होता. त्या वेळी मत मिळाली, आता मंदिर बांधत आहेत. मात्र, त्याचे किती मते मिळतील हे पाहावे लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com