राज ठाकरे सभा : पोलिसांनी कलमे शोधून लावली, गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्ष तुरुंगात

हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कलमाअंतर्गत आधी तपास आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्याची तरतूद आहे. (Raj Thackeray)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर १ मे रोजीच्या जाहीर सभेत चिथावणीखोर वक्तव्य व अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raj Thackeray) सिटीचौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये कलम ११६,११७ १३५ आणि १५३ लावण्यात आले आहे. ही सर्व कलम ही अजामीनपात्र असून यामध्ये तीन ते पाच वर्ष तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे. (MNS) त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास होऊन तो सिद्ध झाला तर राज ठाकरे यांना पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, असे कायदा सांगतो.

राज ठाकरे यांच्यावर ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, त्यानंतर राज्यभरात नेमकी या कलमानूसार शिक्षा काय ? याची उत्सूकता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. (Aurangabad) १ मे रोजीच्या आपल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भाषा केली होती. एवढेच नाही तर चार मे म्हणजे उद्यापासून भोंगे उतरवले गेले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन केले होते.

पोलिसांनी सभेला परवानगी देण्यापुर्वी घातलेल्या बहुतांश अटींचे उल्लघंन देखील राज ठाकरे यांच्याकडून झाल्याचे पोलिस अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. यात लावण्यात आलेली बहुतेक कलमं ही अजामीनपात्र आहेत. अशावेळी जामीन देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला असतो, पोलिस जामीन देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पोलिस केवळ आरोपीला नोटीस बजावून हजर राहण्यास सांगू शकतात.

पोलीस नोटीस देऊ शकतात, हजर राहण्यास सांगू शकतात. त्यानंतरही आरोपी पोलिसांसमोर हजर झाला नाही तर त्याला अटक केली जाऊ शकते. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होऊ शकते का? अशी चर्चा होत आहे. याबाबत कायद्यानूसार राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे, भांडण लावणे असा आरोप आहे.

चिथावणीखोर, भडक वक्तव्य केल्यामुळे पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लघन झाल्यामुळे देखील त्याचे कलम देखील ठाकरे यांच्यावर लावण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक करण्यास ही कलमे पुरेशी मानली जातात. कलम १५३ चा विचार केला तर अधर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भावना राखण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्मिती करणे तसेच वरील अन्य कोणत्याही कारणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कृत्ये करण्याला जबाबदार धरण्यात आले आहे.

MNS Chief Raj Thackeray
पोलिसांनी राज ठाकरेंचे भाषण वारंवार पाच तास ऐकले... नंतरच घेतला कारवाईचा निर्णय...

यामध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रार्थना करण्याच्या ठिकाणी केलेला गुन्हा, तसेच कलम (1) मध्ये नमूद केलेला गुन्हा कोणीही प्रार्थनेच्या ठिकाणी किंवा धार्मिक स्थळी अशा प्रकारचे कृत्य अथवा भाषण केल्यास पाच वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेसह दंडाची तरतूद आहे. कलम 116 हे गुन्हा करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी लावण्यात येते. तर कलम 117 गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण देणे यासाठी असून हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कलमाअंतर्गत आधी तपास आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्याची तरतूद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com